विना अनुदानित शाळांना अनुदान द्यावे, या मागणीसाठी मंगळवारपासून विनाअनुदानीत शाळा बेमुदत बंद ठेवण्याचे आवाहन करीत स्वाभिमानी शिक्षक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे़ ...
वारंवार पाठपुरावा करूनही राणीसावरगाव ते रेवातांडा हा सहा किलोमीटर अंतराचा रस्ता दुरुस्त केला जात नसल्याने पालम आणि गंगाखेड तालुक्यातील पाच गावांमधील ग्रामस्थांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे ...
सणासुदीचे दिवस जवळ येत असताना मनमानी पद्धतीने १ सप्टेंबरपासून रेशन दुकान बंद ठेवून संपावर जाणाºया दुकानदारांचा परवाना रद्द करून तो बचत गटांना दिला जाईल, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी सुकेशिनी पगारे यांनी दिला आहे़ ...
यंदाच्या पावसाळ्यात पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरविली असून सर्वसाधारणपणे पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत तब्बल ४१ टक्के पाऊस कमी झाला आहे. परिणामी खरिपातील पिके नाजूक परिस्थितीत असून जिल्हाभरात उन्हाळ्यासारखी पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
जायकवाडी प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी पालम तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्यापर्यंत देण्याच्या निर्णयात काही तासांतच या विभागाच्या औरंगाबाद येथील मुख्य अभियंत्यांनी बदल केला असून, आता हे पाणी सोनपेठ तालुक्यातील मुदगल बंधाºयापर्यंतच सोड ...
गोदावरी नदीच्या पात्रातील तारुगव्हाण घाटात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या सात ट्रॅक्टरवर महसूल विभागाच्या स्थानिक पथकाने २० आॅगस्ट रोजी कारवाई केली. सातही वाहने जप्त करुन पाथरी पोलीस ठाण्यात लावली आहेत. ...
येथे मानव विकास मिशन अंतर्गत बससेवा सुरू करावी, अशी मागणी वारंवार केल्यानंतरही त्यास दाद मिळत नसल्याने २० आॅगस्ट रोजी सकाळी ७ ते ८ यावेळेत संतप्त झालेल्या धर्मापुरी येथील विद्यार्थिनींनी परभणी- जिंतूर रस्त्यावरील धर्मापुरी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन ...
आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ईव्हीएम मशीनची प्रथमस्तरीय तपासणी अंतीम टप्प्यात असून, या अंतर्गत २२ आॅगस्ट रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ दरम्यान, मॉकपोल घेणार असल्याचे जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी सांगितले़ ...