परभणी जिल्ह्यात बसविले केवळ १४०० सौर कृषीपंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 12:42 AM2020-01-11T00:42:02+5:302020-01-11T00:43:15+5:30

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत जिल्ह्यातील १० हजार ३४४ शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडे प्रस्ताव दाखल केले आहेत़ त्यापैकी आतापर्यत ५ हजार ८१७ शेतकऱ्यांचेच प्रस्ताव मंजूर करून सौर कृषी पंप कंपन्यांनी केवळ १४१० शेतकºयांनाच सौर कृषीपंपाचा लाभ दिला आहे़ त्यामुळे ८ हजार ९३४ शेतकरी लाभाच्या प्रतिक्षेत आहेत.

Only 4 solar farms are installed in Parbhani district | परभणी जिल्ह्यात बसविले केवळ १४०० सौर कृषीपंप

परभणी जिल्ह्यात बसविले केवळ १४०० सौर कृषीपंप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत जिल्ह्यातील १० हजार ३४४ शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडे प्रस्ताव दाखल केले आहेत़ त्यापैकी आतापर्यत ५ हजार ८१७ शेतकऱ्यांचेच प्रस्ताव मंजूर करून सौर कृषी पंप कंपन्यांनी केवळ १४१० शेतकºयांनाच सौर कृषीपंपाचा लाभ दिला आहे़ त्यामुळे ८ हजार ९३४ शेतकरी लाभाच्या प्रतिक्षेत आहेत.
जिल्ह्यामध्ये ९२ हजार कृषीपंप धारक आहेत़ या कृषीपंपांना वीज वितरण कंपनीच्या १० उपविभागांतर्गत वीज पुरवठा केला जातो; परंतु, जिल्ह्यात १३२ केंद्रांची संख्या बोटावर मोजण्या इतकी असल्याने जिल्ह्यातील ३३ केव्ही उपकेंद्रांना सुरळीत वीज पुरवठा होत नाही़ परिणामी कृषीपंपधारकांना सुरळीत वीज पुरवठयासाठी रात्र-रात्र वाट पहावी लागते़ विशेष म्हणजे दिवसभर सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याने शेतकºयांना नाईलाजास्तव रात्रीच्या वेळी आपल्या शेतातील पिकांना पाणी द्यावे लागते़ पाणी देण्याचे काम करीत असताना अनेक शेतकºयांना साप, विंचू आदींनी दंश केल्याने मृत्यूला सामोरे जावे लागले़ या घटनांना आळा घालण्यासाठी व शेतकºयांना दिवसभर सुरळीत वीज पुरवठा मिळण्यासाठी तत्कालीन राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना अंमलात आणली़
सौर कृषीपंप योजना शेतकºयांच्या हिताची असल्याने वीज वितरण कंपनीनेही ग्रामीण भागात जावून या योजनेबाबत जनजागृती केली. शेतकºयांनीही मोठ्या प्रमाणात या योजनेला प्रतिसाद दिला़ आॅनलाईन प्रणालीच्या माध्यामातून जिल्ह्यातील १० हजार ३४४ शेतकºयांनी मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत प्रस्ताव दाखल केले़ त्यापैकी ५ हजार ८१७ प्रस्तावांना मंजुरीही देण्यात आली़ मंजुरी दिलेल्या प्रस्तावांना टाटा पॉवर सोलार, सीआरआय पंप, रविंद्रा एनर्जी, मुद्रा सोलार, जैन इरीगेशन या सौर कंपन्यांची निवडही करण्यात आली़
या कंपन्यांकडून लाभार्थी शेतकºयांना सौर कृषीपंप त्यांच्या शेतात उभारून देण्यात येत आहेत; परंतु, कंपन्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याने ही योजना सुरू होवून वर्षभराचा कालावधी लोटला असला तरी १० हजार ३४४ शेतकºयांपैकी केवळ १ हजार ४१० शेतकºयांनाच सौर कृषीपंप उभारून देण्यात आले आहेत़ उर्वरित ८ हजार ९३४ शेतकरी अद्यापही लाभाच्या प्रतीक्षेत आहेत़ याबाबत लाभार्थी शेतकरी वीज वितरण कंपनीकडे लाभ का मिळत नाही? याबाबत हेलपाटे मारून विचारणा करीत आहेत; परंतु, आमच्या हाती काहीच नसून सर्व आॅनलाईन आहे़ त्यामुळे वरिष्ठ कार्यालयाशीच याबाबत विचारणा करावी, असे प्रत्युत्तर मिळत असल्याने लाभार्थी कृषीपंपधारक हैराण झाले आहेत़
याकडे नव्याने रुजू झालेल्या अधीक्षक अभियंत्यांनी लक्ष देवून मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत शेतकºयांना येणाºया अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी लाभार्थी शेतकºयांतून होत आहे़
एजन्सी निवडीचा पर्याय कधी बंद; कधी सुरू!
४मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकºयांना परिपूर्ण प्रस्तावांसह आॅनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करावयाचा आहे़ अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी ज्या कंपनीकडून सौर कृषीपंप आपल्या शेतात बसून घ्यायाचा आहे़ त्या कंपनीची निवड करणे अपेक्षित आहे; परंतु, आॅनलाईन प्रणालीवर एजन्सी निवडण्याचा पर्याय दुसºया टप्प्यामध्ये केवळ आठच दिवस सुरू राहिला़ त्यानंतर हा पर्याय कधी बंद तर कधी सुरू राहत आहे़ त्यामुळे या पर्यायाच्या लपंडावाने लाभार्थी शेतकरी हैराण झाले आहेत़ जवळपास १८ हजारांचा लोकवाटा भरूनही आपल्याला लाभ मिळतो की नाही? या विवंचनेत सध्या शेतकरी दिसून येत आहेत़
३ हजार ९२० प्रस्ताव अपात्र
४मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत वीज वितरण कंपनीकडे जिल्ह्यातील १० उपविभागांतर्गत १० हजार ३४४ प्रस्ताव दाखल झाले आहेत़ त्यापैकी ५ हजार ९४४ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे़ विशेष म्हणजे ३ हजार ९२० प्रस्ताव वेगवेगळ्या कारणांनी अपात्र ठरविले आहेत़ त्यामुळे या प्रस्तावांतील त्रूटी दूर करून अपात्र करण्यात आलेले प्रस्ताव तत्काळ मंजूर करून लाभार्थ्यांना लाभ द्यावा, अशीही मागणी लाभार्थ्यांतून होत आहे़

Web Title: Only 4 solar farms are installed in Parbhani district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.