आमदार केंद्रे यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 05:46 PM2019-09-27T17:46:20+5:302019-09-27T17:48:29+5:30

जमावबंदी आदेश व महाराष्ट्र विधानसभा आदर्श आचारसंहिता लागू आहे.

Maharashtra Assembly Election 2019 : NCP activist along with MLA kendre, have been charged with violating the Code of Conduct | आमदार केंद्रे यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

आमदार केंद्रे यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देजमावबंदी असताना मुख्य रस्त्यावरून रॅली काढली.

गंगाखेड: जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्या आदेशाने जमावबंदी आदेश व महाराष्ट्र विधानसभा आदर्श आचारसंहिता लागू आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बेकायदेशीर जमाव जमा करून विनापरवाना रॅली काढल्याने आदर्श आचारसंहिता व जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग केल्यावरून गुरुवारी (दि. २६) रात्री उशिराने आ. डॉ. मधुसूदन केंद्रे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडी अंमलबजावणी संचालनालयतर्फे गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या निषेधार्थ आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे व राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गंगाखेड शहर बंदचे आवाहन केले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे भंग करून व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता चालू असताना बेकायदेशीर जमाव जमा करून शहरातील मुख्य रस्त्यावरून रॅली काढली.  तसेच तहसीलदार स्वरूप कंकाळ यांना निवेदन सादर केले होते. 

यांच्यावर गुन्हा दाखल

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बालाजी लोसरवार यांनी गुरुवारी रात्री उशीराने दिलेल्या फिर्यादीवरून आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे, अॅड. मिथिलेश केंद्रे, श्रीकांत भोसले, माधवराव भोसले, सदाशिव भोसले, गिरीश सोळंके, संजय तिरवड, डॉ. देविदास चव्हाण, शंकरराव मोटे, विक्रम काळे, राजेभाऊ वामनराव सातपुते, प्रदीप भोसले, विजय सखाराम गायकवाड, मुरलीधर काळे, सुरेश बळीराम काळे, अनिस खान, दिलीप पुकाने, बबनराव शिंदे, डॉ. त्र्यंबकेश्वर गुडे, विठ्ठल भेंडेकर, लक्ष्मणराव वामनराव जाधव, मारुती पांडुरंग राठोड, शेख सादेक शेख कादर, अॅड. सय्यद अकबर, डॉ फेरोज शेख, अन्वर खान, इसाक माजीद कुरेशी, शेख रौफ, बबन दतराव वडकिले, अजित जयस्वाल, मैनोदीन नईमुद्दीन, एकबाल भाई गुत्तेदार, अजीज भाई गुत्तेदार, प्रभाकर माळवे, भगवान मारोतराव सातपुते, राजू सोळंके, धनंजय केंद्रे, विश्वनाथ बोबडे, ज्ञानोबा व्हावळे, मोहनराव गवळी, लिंबाजीराव देवकते, वामनराव नागरगोजे, शंकरराव मोरे, रमेश पवार, प्रमोद तम्मेवार यांच्यासह इतर ३० ते ४० पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याविरुद्ध महाराष्ट्र विधानसभा निवडणूक संदर्भाने चालू असलेल्या आदर्श आचार संहितेचा व माननीय जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी आदेशाचा भंग करून बेकायदेशीर जमाव जमा करून रॅली काढल्याप्रकरणी कलम १८८ भादवी सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सपोनि बालाजी गायकवाड करीत आहे.

Web Title: Maharashtra Assembly Election 2019 : NCP activist along with MLA kendre, have been charged with violating the Code of Conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.