बसमध्ये चढताना गळ्यातील सोने केले लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:18 AM2021-01-20T04:18:56+5:302021-01-20T04:18:56+5:30

पाथरी-नाथरा ही बस दुपारी १.३० वाजेच्या सुमारास नाथरा येथे जाण्यासाठी स्थानकात उभी होती. या बसमध्ये तालुक्यातील हादगाव ...

Lampas made of gold around the neck while boarding the bus | बसमध्ये चढताना गळ्यातील सोने केले लंपास

बसमध्ये चढताना गळ्यातील सोने केले लंपास

Next

पाथरी-नाथरा ही बस दुपारी १.३० वाजेच्या सुमारास नाथरा येथे जाण्यासाठी स्थानकात उभी होती. या बसमध्ये तालुक्यातील हादगाव येथील सीताबाई रामभाऊ नखाते या बहिणीच्या गावाला जाण्यासाठी निघालेल्या होत्या. पार्वतीबाई गोंगे (रा. पोहे टाकळी) या बस क्रमांक एमएच ०६ एस ८७४८ मध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हातसफाईने लंपास केली. बस स्थानकातून बाहेर येत असताना हा प्रकार या वयोवृद्ध प्रवासी महिलांच्या लक्षात आला. या वेळी त्यांनी बसमध्ये चोरी झाल्याची ओरड केल्यानंतर चालक-वाहकांनी बस थेट पोलीस ठाण्यांमध्ये आणली. दरम्यान, पोलीस ठाण्यात या बसमधील प्रवाशांची तपासणी केली असता चोर आढळून आला नाही. बसच्या प्रवेश दरवाजासमोर काही सोन्याचे मणी आढळून आले. तपासणीनंतर ही बस व प्रवाशांना पुढील प्रवासासाठी सोडून देण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी या महिलांकडून तक्रार नोंदवून घेण्यात आली.

Web Title: Lampas made of gold around the neck while boarding the bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.