बळीराजाचे श्रम होणार कमी; बैल, ट्रॅक्टरचलित फवारणी यंत्र झाले विकसित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 03:28 PM2020-08-10T15:28:53+5:302020-08-10T15:31:59+5:30

एकाला १४ नोझल तर दुसऱ्या यंत्राला १६ नोझल बसविण्यात आले. 

Baliraja's labor will be less; Developed bullock, tractor driven sprayer | बळीराजाचे श्रम होणार कमी; बैल, ट्रॅक्टरचलित फवारणी यंत्र झाले विकसित

बळीराजाचे श्रम होणार कमी; बैल, ट्रॅक्टरचलित फवारणी यंत्र झाले विकसित

googlenewsNext
ठळक मुद्देआधुनिक बीबीएफ यंत्र विकसित आतापर्यंत १२५ एकर क्षेत्रांवर पेरणी कृषी 

परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने ट्रॅक्टरचलित, तसेच बैलचलित सौर ऊर्जेवर चालणारे फवारणी यंत्र विकसित केले. परभणी तालुक्यातील जांब येथे शनिवारी या यंत्राचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखविण्यात आले़ 

१४, १६ नोझलमध्ये तयार केले यंत्र
बीबीएफ यंत्राचाच एक भाग असलेल्या ट्रॅक्टर चलित फवारणी  यंत्राची माहिती व प्रात्यक्षिक डॉ़ स्मिता सोलंकी यांनी करून दाखविले़ शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या ट्रॅक्टरचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाही़ ट्रॅक्टरच्या टायरची जाडी जास्त असल्याने ते फवारणीसाठी वापरले जात नाही़ त्यामुळे कृषी विद्यापीठाने स्लिम टायर वापरून फवारणी यंत्र तयार केले आहे़ ट्रॅक्टरवरून चालणारे हे यंत्र दोन पद्धतीत उपलब्ध आहे़ एकाला १४ नोझल तर दुसऱ्या यंत्राला १६ नोझल बसविण्यात आले. 

सोयाबीन व इतर पिकांमध्ये हे ट्रॅक्टर चलित फवारणी यंत्र चांगले काम करते़ उभ्या पिकामध्ये या यंत्राच्या सहाय्याने कोळपणी आणि फवारणी करणे शक्य आहे़ त्याचबरोबर बैलचलित फवारणी यंत्रही विद्यापीठाने विकसित केले. हे यंत्र सौर उर्जेवर चालते़ त्यामुळे इंधनाची बचत होते, असे कृषी विद्यापीठातील डॉ़ स्मिता सोलंकी यांनी या सांगितले. या प्रसंगी कुलगुरु अशोक ढवण, विस्तार शिक्षण संचालक डॉ़ देवराव देवसरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे, प्राचार्य डॉ़ उदय खोडके, संशोधन अभियंता डॉ़ स्मिता सोलंकी, उपविभागीय अधिकारी सागर खटकाळे, जि़प़ सदस्य बाळासाहेब रेंगे,  महेश शेळके, राम गमे, रामकृष्ण रेंगे यांची उपस्थिती होती़ 

ट्रॅक्टरवर आधारित यंत्र
कृषी विद्यापीठाने बीबीएफ हे यंत्र तयार केले आहे़ या यंत्राच्या साहाय्याने पेरणी, रासणी, कोळपणी, तणनाशक व कीटकनाशक फवारणी आदी कामे केली जाऊ शकतात़ ट्रॅक्टरवर आधारित हे यंत्र आहे़ सध्या फवारणीचे दिवस असल्याने विद्यापीठानेच विकसित केलेल्या ट्रॅक्टरचलित फवारणी यंत्र आणि बैलचलित सौरफवारणी यंत्र अशा दोन यंत्रांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले़ 

शेतकऱ्याची गरज ओळखून केले यंत्र विकसित
मराठवाड्यातील शेती प्रामुख्याने कोरडवाहू असून, सोयाबीन लागवडीचे क्षेत्र वाढत आहे़ कोरडवाहू शेती पिकांचे उत्पादन पडणाऱ्या पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते़ ही गरज ओळखून कृषी विद्यापीठाने बीबीएफ हे यंत्र विकसित केले आहे़ या यंत्राच्या साहाय्याने आतापर्यंत १२५ एकर क्षेत्रावर पेरणी केल्याचे कुलगुरू डॉ़ अशोक ढवण यांनी सांगितले.

Web Title: Baliraja's labor will be less; Developed bullock, tractor driven sprayer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.