परभणीच्या उरुसात २० कोटींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 12:27 AM2020-02-18T00:27:33+5:302020-02-18T00:28:23+5:30

येथील सय्यद शाह तुराबूल हक यांच्या उरुसाची १६ फेब्रुवारी रोजी सांगता झाली असून, १७ दिवसांच्या काळात या उरुसामध्ये तब्बल २० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे़ दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी उरुसात भक्तीभावे दर्शनासाठी येणाºया भाविकांनी खरेदीचाही आनंद लुटल्याचे स्पष्ट होत आहे़

5 crore turnover in Parbhani | परभणीच्या उरुसात २० कोटींची उलाढाल

परभणीच्या उरुसात २० कोटींची उलाढाल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील सय्यद शाह तुराबूल हक यांच्या उरुसाची १६ फेब्रुवारी रोजी सांगता झाली असून, १७ दिवसांच्या काळात या उरुसामध्ये तब्बल २० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे़ दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी उरुसात भक्तीभावे दर्शनासाठी येणाºया भाविकांनी खरेदीचाही आनंद लुटल्याचे स्पष्ट होत आहे़
सय्यद शाह तुराबूल हक यांचा उरुस राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक म्हणून ओळखला जातो़ १५० वर्षांची परंपरा असलेल्या या उरुसात दरवर्षी लाखो भाविक दाखल होतात़ उरुसातील भाविकांची संख्या लक्षात घेवून राज्यासह परराज्यातूनही व्यापारी या ठिकाणी व्यवसायाच्या निमित्ताने येत आहेत़ यावर्षी ३१ जानेवारी रोजी उरुसाला प्रारंभ झाला़ १६ फेब्रुवारीपर्यंत या उरुस काळात भाविकांची मोठी गर्दी झाली होती़ मीना बाजार, विविध आकाश पाळणे, मनोरंजनाचे खेळ यासह वेगवेगळ्या राज्यातून प्रसिद्ध असलेली मिठाई उरुसामध्ये विक्री झाली़
या काळात झालेल्या उलाढालीचा एकंदर आढावा घेतला असता सुमारे २० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे़ उरुसामध्ये साधारणत: ९५० व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली होती़ त्यात महिलांच्या सौंदर्य प्रसाधनांपासून ते संसारोपयोगी वस्तू, मुलांची खेळणी, कपडे असे विविध स्टॉल्स उपलब्ध होते़ या बाजारात प्रत्येक दुकानामध्ये दररोज सुमारे ८ हजार रुपयांचा व्यवसाय झाला़ १५ दिवसांच्या काळात ११ कोटी ४० लाख रुपयांचा व्यवसाय या ठिकाणी झाला आहे़ तर मीना बाजारातून जवळपास ९ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे़ याशिवाय रस्त्याच्या कडेला विविध वस्तू विक्री करणारे लघु व्यावसायिक, खाद्य पदार्थाची दुकाने या माध्यमातूनही मोठी उलाढाल झाली आहे़ एकंदर, सर्व साधारणपणे २० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे़
वक्फ बोर्डाला २७ लाखांचे उत्पन्न
परभणी जिल्हा वक्फ बोर्डाच्या माध्यमातून येथील उरुसाचे नियोजन केले जाते़ उरुसात लावले जाणारे स्टॉल्स, फेरीवाले यांच्याकडून वक्फ बोर्डाला उत्पन्न प्राप्त होते़ त्यानुसार ९५० दुकानांच्या माध्यमातून ९७ लाख ९३ हजार ५०० रुपये, फेरीवाल्यांकडून २ लाख ९९ हजार रुपये, वेगवेगळ्या आकाश पाळणे व्यावसायिकांकडून ८ लाख ८५ हजार रुपये आणि विद्युत कंत्राटदाराच्या माध्यमातून २ लाख १० हजार रुपये असे सुमारे ४१ लाख ९३ हजार रुपयांचे उत्पन्न वक्फ बोर्डाला प्राप्त झाले आहे़ त्या तुलनेत बोर्डाच्या वतीने संदल, उरुसाची प्रसार, प्रसिद्धीसाठी ५५ हजार रुपये आणि इतर १५ लाख रुपये खर्च केले असून, प्राप्त उत्पन्नामधून बोर्डाला १५ लाख ५५ हजार रुपयांचा खर्च झाला आहे़ त्यामुळे उरुसाच्या माध्यमातून वक्फ बोर्डाला २६ लाख ३८ हजार निव्वल उत्पन्न प्राप्त झाले आहे़

Web Title: 5 crore turnover in Parbhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.