मासिक पाळीचे 3 दिवस सुटी मिळेल का?

By admin | Published: April 26, 2017 05:40 PM2017-04-26T17:40:36+5:302017-04-26T17:42:20+5:30

इटली सरकारने नोकदरदार स्त्रियांना महिन्यातल्या मासिक पाळीच्या तीन दिवशी पगारी सुटी देण्याचे ठरवले आहे.

Will menstruation be for 3 days holidays? | मासिक पाळीचे 3 दिवस सुटी मिळेल का?

मासिक पाळीचे 3 दिवस सुटी मिळेल का?

Next
>-ऑक्सिजन टीम
 
 
 
‘त्या’ चार दिवसांविषयी बोलणंच आपल्याकडे पाप. एकदम गप्पं बसायचं आणि बायका/मुलींनी पोटदुखी दाबत, पेन किलर घेत काम करत रहायचं. बोलायचं नाही. ऑफिसमधल्या पुरुष सहकार्‍यांना तर काही सांगण्याची सोयच नाही, त्यांना चुकून माकून काही कळलं तरी ऑफिसभर त्याचं गॉसिपिंग होण्याची चर्चा.
अशा वातावरणात महिला कर्मचार्‍यांना कोण त्या चार दिवसांची पगारी रजा देणार? 
मात्र  इटली सरकारने मात्र एक महत्वाचं पाऊल उचलत आता नोकदरदार स्त्रियांना महिन्यातल्या मासिक पाळीच्या तीन दिवशी पगारी सुटी देण्याचे ठरवले आहे. आणि मासिक पाळीचा काही विकार असेल, त्यासाठी विश्रांती, उपचार करुन घ्यायचे असतील तर पगारी महिनाभर रजाही मंजूर होवू शकते.
युरोपियन देशांपैकी इटली हा अशी सुटी देणारा पहिला देश ठरणार आहे.
हे सारं वाचताना कितीही विचित्र आणि आपल्या समाजात आणि बदलत्या व्यावसायिक वातावरणात अशक्यच वाटत असलं तरी जगभरातल्या अनेक देशांनी अशा रजा कधीच दिल्या आहेत. 
इंडोनेशियात मासिक पाळीच्या काळात दोन दिवस पगारी सुटी मिळते.
जपानने तर सर्वप्रथम हा निर्णय घेतला होता आणि 1947 सालापासून  जपानमध्ये महिलांना मासिक चक्रात पगारी सुटी मंजून करण्यात आली आहे. ( तेव्हा आपण किती मागास होतो आणि आजही यासंदर्भात किती मागास आहोत याचा विचारच न केलेला बरा!) 
दक्षिण कोरियामध्ये खासगी-सरकारी सर्व क्षेत्रातल्या महिलांना 3 दिवस त्या काळात सुटी मिलते. याशिवाय दरवर्षी 33 दिवस पगारी सुटी आजारपणं आणि उपचारासाठी मिळू शकते.
2007 साली नायके या जगप्रसिद्ध कंपनीने जगभरातल्या आपल्या महिला कर्मचार्‍यांना मासिक पाळीच्या काळातली 3 दिवस पगारी सुटी मंजूर केली आहे. 
आणि आता इटलीने हे पाऊल उचचलं आहे.
त्यानिमित्तानं जगभर या विषयाची चर्चा आहेच. अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार महिलांना भारतात आजही पुरुषांच्या तुलनेत कमी वेतन मिळतं. तिथं अशाप्रकारची सुटी मिळावी अशी मागणी तरी कोणी करतं का?
नाहीच करत!
पेन किलर घेत, अंगावर काढत, वेदना सहन करत आणि पूर्ण मुस्कटदाबी सोसत तरुण मुली, महिला कामावर जातात. आणि जाहिरातीही दाखवतात त्या काळात काम करणार्‍या मुलींचं हसरं चित्र. ते चित्र खोटं असतंच, प्रत्यक्षात असतात फक्त वेदना.
या वेदनांना सुटी मिळेल का?
आपण करु का अशी मागणी??

Web Title: Will menstruation be for 3 days holidays?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.