सुरक्षित गर्भपाताचा अधिकार का नाकारता? मोरोक्को  आणि  अमेरिकेतील  युवतींचा  सवाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 03:16 PM2019-10-10T15:16:28+5:302019-10-10T15:16:42+5:30

कुठं मोरक्को कुठं अमेरिका मात्र या दोन्ही जगात आता गर्भपात या विषयावरून भयंकर वाद सुरू आहेत.

Why deny the right to safe abortion? | सुरक्षित गर्भपाताचा अधिकार का नाकारता? मोरोक्को  आणि  अमेरिकेतील  युवतींचा  सवाल 

सुरक्षित गर्भपाताचा अधिकार का नाकारता? मोरोक्को  आणि  अमेरिकेतील  युवतींचा  सवाल 

googlenewsNext
ठळक मुद्देगर्भपाताचा सुरक्षित अधिकार तरुणींना नसावाच असं म्हणत कायद्याचा बडगा उगारला जातोय.

- कलीम अजीम

गर्भपात बंदी. गेल्या आठवडय़ात गर्भपातबंदी कायद्यासंदर्भात घडलेल्या दोन घटनांनी जगाचं लक्ष वेधलं. पहिली घटना मोरक्कोमधली. त्यात हजारा रायसोनी नावाच्या एका महिला पत्रकाराला अवैध गर्भपात केल्याचा आरोप ठेवून शिक्षा सुनावण्यात आली. दुसर्‍या घटनेत अमेरिकेतील जॉर्जिया राज्यात गर्भपाताचे नियम अधिक कठोर करणार्‍या ‘हार्टबीट’ विधेयकामुळे वादळ उठलं.
आपल्यापासून बरंच लांब आहे हे जग तसं; पण बंदी आणि सक्ती काय करू शकतात वैयक्तिक जगण्यात याची उदाहरणं आहेत.
म्हणून हे माहीत असणं गरजेचं आहे.
मोरक्को हे उत्तर आफ्रिकेतलं एक मुस्लीम राष्ट्र. हजारा रायसोनी ही तिथली धडाडीची पत्रकार. सरकार व यंत्रणेविरोधात बातम्या देण्यासाठी ती प्रसिद्ध आहे. 28 वर्षीय हजारा अरबी वृत्तपत्र ‘अखबार अल यौम’मध्ये काम करते. ती राजधानी राबत येथे तिच्या प्राध्यापक जोडीदारासह राहते. त्यांचं लगA ठरलेलं आहे. मात्र ऑगस्टमध्ये तिच्यावर पाळत ठेवून तिला अटक करण्यात आली. तिचा गुन्हा काय तर ती  नियोजित जोडीदारासह स्रीरोगतज्ज्ञांच्या क्लिनिकमधून बाहेर पडताना दिसली.
अवैधरीत्या गर्भपात करणार्‍या काही क्लिनिकवर मोरक्कन सरकारची नजर होती. हजारा उपचारासाठी गेली ते त्यातलंच क्लिनिक होतं. अटक केल्यानंतर हजाराने तुरु ंगातून पत्र लिहून सर्व आरोप खोटे व निराधार असल्याचं सांगितलं. तिचं म्हणणं आहे की, तिला गर्भधारणा झालीच नव्हती तर गर्भपात कसा करणार? तिने सरकारी यंत्रणांवर भेदभावाचा आरोप लावला आहे. ती म्हणते की, सरकार तिच्यावर नाराज आहे. कारण, ती सरकारविरोधी भूमिका घेणार्‍या संस्थेत काम करते. 
हजारा रायसोनीवर अवैधरीत्या गर्भपात केल्याच्या खटला भरण्यात आला. या प्रकरणी 1 ऑक्टोबरला राजधानीमधील राबत कोर्टाने निर्णय देत शिक्षा सुनावली. हजारा व तिच्या जोडीदाराला एक वर्ष तर डॉक्टरला दोन वर्षाच्या शिक्षेचा आदेश काढला. कोर्टाने नर्सला दोषी ठरवून तिला निलंबित केलं.
हजाराच्या वकिलाने निकालाला सर्वोच्च कोर्टात आव्हान देणार असल्याचं म्हटलं आहे, तर दुसरीकडे देशात हजाराच्या समर्थनार्थ मोठय़ा संख्येने लोक रस्त्यावर उतरले आहेत. हजारा व तिच्या जोडीदाराला अटक केल्यापासून मोरक्कन नागरिक सरकारच्या या घटनेचा निषेध करत ‘फ्री हजारा’ मोहीम राबवत आहेत. 
कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर मोरक्कन लोक आंदोलन करतच आहेत.
हजाराच्या निमित्ताने मोरक्कोत गर्भपातबंदी कायदा शिथिल करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. हजारो लोकांनी रस्त्यावर येत गर्भपात हक्काचं समर्थन करत आहेत. सुरक्षित गर्भपात हा प्रत्येक स्रीचा मूलभूत हक्क आहे तो मिळालाच पाहिजे अशी स्थानिकांची मागणी आहे.
मोरक्कोत आईचा जीव धोक्यात असेल किंवा लैंगिक अत्याचारातून स्री गर्भवती राहिल्यास सुरक्षित गर्भपाताला परवानगी आहे. मात्र अन्यवेळी गर्भपाताचे कायदे कडक आहेत.
**
दुसरीकडे अमेरिकेसह युरोप खंडात सुरक्षित गर्भपाताची मागणी जोर धरत आहे. अमेरिकेत जॉर्जिया राज्यात 6  आठवडय़ानंतर गर्भपाताला परवानगी नाकारणारं ‘हार्टबीट बिल’ हा कायदा नुकताच लागू झालेला आहे. अमेरिकेतील 50 राज्यांत गर्भपातबंदीचा कठोर कायदा अमलात आहे. हे नियम शिथिल करावेत, अशी मागणी करत जॉर्जियामध्ये लोक रस्त्यावर उतरले होते. सुरक्षित गर्भपाताच्या हक्काच्या लढय़ाला अमेरिकेत दोन शतकाचा दीर्घ इतिहास आहे. हार्टबीट विधेयकानंतर अमेरिकेमध्ये सुरक्षित गर्भपाताचा हक्क मागणार्‍या व्यापक चळवळीची आखणी सुरू असल्याचं माध्यमांनी नमूद केलं आहे.
गर्भपातावर बंदी आणि न करण्याची सक्ती यावर अशी विकसित आणि अविकसित देशातही एकसमान चर्चा होताना दिसते आहे.

 

Web Title: Why deny the right to safe abortion?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.