व्हॉट्सअ‍ॅप नात्यात भांडणं लावतंय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 06:16 PM2020-02-27T18:16:28+5:302020-02-27T18:17:21+5:30

तुझं लास्ट सीन गायब निळ्या टिकल्या ऑफ हे असलं राजकारण? हे असलं पॉलिटिक्स करतं का कुणी प्रेमात?

is whats app breaking your relationship? | व्हॉट्सअ‍ॅप नात्यात भांडणं लावतंय का?

व्हॉट्सअ‍ॅप नात्यात भांडणं लावतंय का?

Next
ठळक मुद्देलास्ट सिनचा फास

गौरी  पटवर्धन 

“Hi”
“Hm”
“Good morning”
“Hmm”
‘‘काय झालं? आज मूड नाहीये का मॅडमचा?’’
“Shut up. I don’t want to talk to you.”
‘‘पण का जानू? माझं काही चुकलं का?’’
‘‘नाही नाही. तुझं कधी काही चुकतं का? मीच स्टुपिड आहे म्हणून तुझ्यावर एवढा ट्रस्ट ठेवला.’’
एवढं सगळं होऊनही नेमकं  काय झालंय हे जानूच्या बॉयफ्रेण्डच्या जाम लक्षात येत नाही. तो बिचारा विनवण्या करत राहतो, की काय झालंय ते तरी सांग. कारण जानू आणि बॉयफ्रेण्डचं अफेअर झाल्यानंतर थोडय़ाच दिवसात त्याला हे नीट समजलेलं असतं, की रुसणं हा तिचा अधिकार आहे आणि समजूत काढणं हे त्याचं कर्तव्य. पण कशाबद्दल समजूत काढायची हेही माहिती नसताना काय करायचं हे मात्र त्याला बिचार्‍याला हतबल करून टाकतं.
त्यात जानू रिप्लाय करत नाही. आई येऊन चार वेळा ‘सकाळी सकाळी फोन घेऊन बसल्याबद्दल’ उद्धार करून जाते. तो बिचारा जरा कुठे टिंग वाजलं की व्हॉट्सअ‍ॅप चेक करतो, तर त्यावर मित्राने फॉरवर्ड पाठवलेला असतो,
‘‘व्हॉट्सअ‍ॅप आणि बाळाचं डायपर सारखंच. झालेलं काही नसतं; पण थोडय़ा थोडय़ा वेळाने चेक करत राहायला लागतं.’’ एरवी असल्या विनोदावर एखादा भारी जीआयएफ टाकणारा तो मित्राला फुल्याफुल्यांनी न्हाऊ घालतो. इथे जानूचा रिप्लाय येत नाही आणि या साल्याला फालतूगिरी सुचतेय.
परत टिंग वाजतं, हा बिचारा परत व्हॉट्सअ‍ॅप बघतो, तर त्याच्या शिव्यांनी चेकाळून मित्राने अजून एक फॉरवर्ड पाठवलेला असतो,
‘‘व्हॉट्सअ‍ॅप आणि आहेराच्या साडय़ा सारख्याच. कोणीही उघडूनसुद्धा बघत नाही; पण इकडचा माल तिकडे आणि तिकडचा माल इकडे.’’
तो इरिटेट होऊन मित्राला थोडय़ा वेळासाठी ब्लॉक करून टाकतो. जानू काही रिप्लाय देत नाही म्हटल्यावर तो घाईघाईने आवरून कॉलेजला जाऊन बसतो. ती येतेच जरा वेळाने. अजूनही तिचा मूड गेलेलाच असतो. पण ती त्याच्या शेजारी नेहेमीसारखी येऊन बसते. त्याला जरा मनातून रिलॅक्स्ड वाटतं. आपण तिच्या आधी कट्टय़ावर येऊन बसल्याबद्दल तो मनातल्या मनात स्वतर्‍ला शाब्बासकी देतो. पण ती पुढे काहीच बोलत नाही.
च्यायला! आपण अशी काय माती खाल्ली असेल? विचार करून करून त्याच्या मेंदूचा पार भुगा व्हायची पाळी येते. शेवटी तो दुसर्‍या बाजूला बसलेल्या मित्राला एक सणसणीत लाथ मारतो. मग तो मित्र तिच्या मैत्रिणीला घेऊन ‘लायब्ररीत पुस्तक चेंज करायला’ जातो.
अखेर जानू समोर असताना थोडीशी प्रायव्हसी मिळते आणि तो बिचारा विनवण्यांचं अकाउण्ट परत ओपन करतो.
‘‘हे बघ. मी आधीच सॉरी म्हणतो. पण मला हे तरी सांग की माझं चुकलं काय?’’
‘‘तुला माहिती नाही?’’ ती त्याच्याकडे अविश्वासाने बघत म्हणते.
‘‘तुझी शप्पथ.’’ अजूनही तो मनातल्या मनात आठवत असतो, की आपण हिच्या कुठल्या मैत्रिणीशी सलगी केली का, तिच्या मैत्रिणीच्या फोटोला चुकून लाइकच्या ऐवजी हार्ट दिला का? त्याला असलं काहीही केल्याचं आठवत नाही. शेवटी तीच त्याला त्या सिच्युएशनमधून सोडवते.
‘‘तुझ्या व्हॉट्सअ‍ॅपचं सेटिंग चेक कर, म्हणजे समजेल.’’
तो घाईघाईने व्हॉट्सअ‍ॅप उघडतो. पण तरीही त्याला त्यात काही दिसत नाही. आता तो अजूनच मठ्ठ चेहेर्‍याने तिच्याकडे बघत राहतो. तिचा अजून जास्त संताप होतो. शेवटी ती म्हणते,
‘‘हे बघ, तुला जर का माझ्याशी बोलायचं नसेल ना, तर नको बोलूस. पण हे असलं घाणेरडं पॉलिटिक्स माझ्याशी केलंस, तर मी सरळ ब्रेकअप करून टाकीन.’’
आता मात्र त्याचाही पेशन्स संपतो. तोही जरा चिडून म्हणतो,
‘‘कसलं पॉलिटिक्स? काय झालंय?’’
‘‘काय झालंय?’’ ती त्याचा आणि तिचा फोन त्याच्या डोळ्यासमोर नाचवत म्हणते, ‘‘काल मी तुला फक्त म्हटलं की तू खरंच 10 ला झोपतोस का? कारण तुझा लास्ट सीन तर रात्री 1 चा होता. तर तू डायरेक्ट लास्ट सीन शेअर करायलाच बंद करून टाकलंस. शिवाय ब्लू टिक्स पण ऑफ करून टाकलेस. म्हणजे मी ते बघायला नको आणि काही बोलायला पण नको.’’
‘‘अगं, ते तुझ्यामुळे नाही. पप्पांनी विचारलं सकाळी ते कसं करतात. ऐक तर खरी, तुझी शप्पथ. जानू केव्हाच रागारागात उठून गेली होती. परत फोन वाजला म्हणून त्याने व्हॉट्सअ‍ॅप उघडलं तर एका दुसर्‍या ग्रुपवर फॉरवर्ड आला होता..

Somewhere between last seen and blue ticks, whatsapp spoiled relationships…
 


 

Web Title: is whats app breaking your relationship?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.