These seven gurus are in your life are must! | हे सात गुरू आपल्या आयुष्यात हवेच!
हे सात गुरू आपल्या आयुष्यात हवेच!

-विनायक पाचलग

गुरु पौर्णिमा होऊन एक-दोनच दिवस झालेत.  आजकाल व्हॉट्सअँपमुळे गुरु पौर्णिमा जोरदार सेलिब्रेट होते हे जरी खरं असलं तरी आताच्या काळात गुरुची गरज सर्वाधिक आहे. गुरु ही फार मोठी संकल्पना आहे. सोपं नाही ते. मात्र आता नव्या काळात आपण शिक्षण या अर्थी म्हणून एखादी व्यक्ती, इंटरनेट किंवा पुस्तक असेल त्यांची मदत मागू. आजच्या जगात जॉब असो वा व्यवसाय, त्यात यशस्वी व्हायचं असेल तर वेगवेगळे सात प्रकारचे गुरु आपल्या आयुष्यात ‘मस्ट’ आहेत.

1. तंत्रज्ञान गुरु : रोज बदलणारं तंत्नज्ञान समजावून सांगणारा, त्यातलं काय उपयोगी आहे, काय नाही हे उलगडवून सांगणारा एखादा गुरु हवाच. मग यात फक्त सोशल मीडिया आणि अँप येत नाहीत तर अगदी स्मार्ट टीव्हीपासून ते क्वांटम कम्युटिंगपर्यंत जे काही लेटेस्ट आहे त्याची तोंडओळख करून देणारा कोणीतरी आपल्या आजूबाजूला हवाच. मग तो एखादा टेक्नॉलॉजीबद्दल अँक्टिव्ह असणारा मित्न असेल किंवा एखादा ऑनलाइन ब्लॉग किंवा यू ट्यूबर. पण र्शद्धेने आणि नियमितपणे ते शिकत राहिलं पाहिजे हे नक्की.

2. फिटनेस गुरु : आजच्या कामाच्या पद्धती आणि वेळा इतक्या विचित्न आहेत आणि त्या भविष्यात अधिक विचित्न होणार आहेत. वर्क फ्रॉम होम, असाइन्मेंट बेस्ड काम यामुळे रु टीन असं काही उरेल असं वाटत नाही. अशावेळी आपल्या शरीरावर आपलं नियंत्रण हवंच. मग त्यासाठी नियमित व्यायाम, खाण्यावर कंट्रोल या गोष्टी ओघानं आल्याच. त्यामुळे, जॉबमध्ये मॅरेथॉन खेळायचं असेल तर हे सगळं समजवणारा, शास्त्रीय पद्धतीने करून घेणारा एखादा गुरु हवाच. बर इथं गूगल गुरु चालत नाहीत हेही लक्षात घेतलं पाहिजे. कारण, प्रत्येकाच शरीर वेगळं असतं. त्यामुळे, सगळ्यांना एकच नियम लागू होत नाही.
3. योग गुरु: आजच्या काळात जॉब आणि स्ट्रेस हे समानार्थी शब्द आहेत. ही नवी रिअँलिटी आपण मान्य केली तर मग त्याच्यावर रामबाण उपाय म्हणजे योग आणि प्राणायाम. उत्तम मानसिक ऊर्जा मिळत राहते. देशभरात फेमस असणा-या  योग गुरुंच मार्गदर्शन असो वा आपल्या गल्लीतले योगा करून फिट राहिलेले एखादे आजोबा. ते शिकणं आणि करत राहणं इज मस्ट.

4. फायनान्स गुरु : पैसे मिळवणं सोपं असतं; पण ते टिकवणं जास्त अवघड असतं असं म्हणतात. आजकाल जॉब लागला रे लागला की ब-यापैकी पैसे हातात येऊ लागतात. पण, त्याचं काय करायचं हेच समजत नाही. मग पटकन पैसे वाढण्यासाठी कोण शेअर मार्केटमध्ये जातो तर कोणाला गाडीचा किंवा घराचा मोठा इएमआय लागतो. या दोन्ही केसमध्ये अचानक जॉब बदलायची वेळ आली किंवा असाइन्मेंट नाही मिळाली तर सगळं गणित कोलमडतं. ते टाळण्यासाठी पहिल्यापासूनच ज्याला अर्थकारण कळतं असा प्रोफेशनल माणूस आपल्या सोबतीला हवा. पैशाच्या बाबतीत ‘मला कळतं सगळं’ हा अँटिट्यूड माती करतो. 
5. लाईफ स्किल गुरु : आजकाल सॉफ्ट स्किल लागतात हे तर आहेच; पण याच सॉफ्ट स्किलचा स्कोप अजून थोडा वाढवला तर लाईफ स्किल्स होतात. यामध्ये अगदी मुलाने मुलीशी आणि मुलीने मुलाशी प्रोफेशनल कसं बोलावं, जेवताना काटे चमचे कसे वापरावेत, सॅलरी स्लिप कशी वाचावी आशा असंख्य छोट्या छोट्या गोष्टींचा समावेश होतो. हे शिकवणारी कोणती यंत्रणा वा शाळा नाही. पण, एखाद्या स्मार्ट सिनिअरकडून किंवा ऑफिस कलिगला मनातल्या मनात गुरुमानून हे सगळं पटकन शिकून घेतलेलं बरं.

 परदेशी गुरु : आजकाल अख्खं जग एकच मार्केट झालं आहे. त्यामुळे देश, धर्म, जात, रंग अशा सगळ्या गोष्टींच्या पुढं जाऊन वेगवेगळ्या देशातल्या लोकांना एक टीम म्हणून काम करावे लागते. अशावेळी या सगळ्यांबद्दल सहिष्णू असणं, वेगवेगळ्या लोकांच्या जीवनपद्धती, त्यांचे बायसेस हे सगळं कायम माहीत करून घेतलं तर पुढे जायला तो फायदा ठरतो. यासाठी संधी मिळेल तसे सोशल मीडियाचा वापर करून एकदोन परदेशी मित्र  बनवणं व त्यांच्याकडून शिकत राहणं फायद्याचं.

7. भाषा गुरु: नव्या जगात राज्य करायला उत्तम भाषा बोलता येणं हा राजमार्ग आहे. इंग्लिशवर कमांड हवीच. त्यासाठी जे लागेल ते करायला लागले तरी बेहत्तर अशी परिस्थिती आहे. खरं तर मातृभाषा, हिंदी आणि इंग्रजी सोडून अजून एक फॉरेन लँग्वेज शिकता आली तर सोन्याहून पिवळे. या गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं यातले किती गुरुआपल्याला आहेत ते तपासूया आणि जे नसतील त्यांचा शोध घेऊया.


(विनायक मुळात इंजिनिअर असून, आता एक स्टार्टअप कंपनी चालवतो)

info@pvinayak.com


Web Title: These seven gurus are in your life are must!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.