वुहानमध्ये सेल्फ ड्रायव्हिंग कार आता र्निजतुकीकरणाचं काम करणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 05:43 PM2020-05-28T17:43:33+5:302020-05-28T17:45:23+5:30

पुढे जगभर या गाडय़ांना मागणी असेल असं दिसतं.

Self-driving cars - neolix van | वुहानमध्ये सेल्फ ड्रायव्हिंग कार आता र्निजतुकीकरणाचं काम करणार!

वुहानमध्ये सेल्फ ड्रायव्हिंग कार आता र्निजतुकीकरणाचं काम करणार!

Next
ठळक मुद्देसेल्फ ड्रायव्हिंग व्हॅन

  प्रसाद ताम्हनकर 


चायनीज सेल्फ ड्रायव्हिंग डिलिव्हरी स्टार्टअप ’निओलिक्स’ वुहानमध्ये वैद्यकीय पुरवठा करण्यासाठी तसेच रस्ते र्निजतुक करण्यासाठी आपली सेल्फ ड्रायव्हिंग व्हॅन वापरत आहे. ह्या संकल्पनेला उत्तम प्रतिसाद मिळत असून, कंपनीने आता चक्क अजून 200 व्हॅन्सची ऑर्डरदेखील मिळवली आहे. ह्या सेल्फ ड्रायव्हिंग व्हॅनचा उपयोग बघता, चायनीज सरकार ह्या गाडय़ांसाठी आता सबसिडीदेखील देण्यास तयार झाले आहे. सेल्फ ड्रायव्हिंग कारचे तंत्नज्ञान किती उपयुक्त ठरू शकते हे पाहिल्यानंतर, चीन सरकारने डिलिव्हरी व्हॅन खरेदी करणो व त्या चालविण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही सबसिडीची योजना आणली आहे; किमतीच्या तुलनेत 60 टक्के. हे लक्षात घेऊन, निओलिक्सने तर वर्षाच्या अखेरीस 1000 व्हॅन तयार करून त्यांची विक्री करेल अशी अपेक्षा आहे. ह्यापूर्वी कंपनीने 2019 पासून फक्त 125 गाडय़ांचे उत्पादन केले होते. हे बघता आता ह्या कंपनीला खरेच अच्छे दिन आलेत म्हणायला हरकत नाही. कंपनी ह्यासाठी तब्बल 29 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक वाढवत आहे. ह्या सेल्फ ड्रायव्हिंग कारमुळे कार्बनचे उत्सर्जनदेखील आटोक्यात येईल असा कंपनीचा दावा आहे.


 सेन्सर आणि एचडी नकाशे यांचा योग्य ताळमेळ वापरून या गाडय़ा आपल्या  मार्गातील अडथळे शोधतात आणि त्यांना टाळतात. प्रतितास पन्नास किलोमीटर्पयत वेग पकडू शकणा:या या गाडय़ा, एका बॅटरी चार्जवरती शंभर किलोमीटरचा प्रवास करू शकतात. गर्दी टाळण्यासाठी आणि संसर्गाचा धोका अधिकाधिक कमी करण्यासाठी अशा वाहनांचा अत्यंत उपयोग होत असल्याचे लक्षात आले आहे. ही वाहनं प्रत्यक्ष मानवी संपर्क टाळण्यास मदत करतातच, पण त्याच बरोबर रस्ते र्निजतुक करणं, आरोग्य विभागातील कर्मचा:यांर्पयत जेवण व इतर वैद्यकीय सामान पोचवणं अशी कामंदेखील लीलया पार पाडतात. चीनमधील ड्रायव्हरलेस कारचा बाजार हा जणू सोन्याची खाण बनणार असल्याचा अनेक तज्ज्ञांचा अंदाज आहे. मॅककिन्सीच्या अहवालानुसार सार्वजनिक रस्त्यांवरील सेल्फ ड्रायव्हिंग कारची संख्या 8 दशलक्षांर्पयत पोचण्याची शक्यता असून, 2क्3क् र्पयत या भागातील सेल्फ ड्रायव्हिंग वाहनं आणि त्यांच्याशी संबंधित इतर सेवांची बाजारपेठ ही 5क्क् अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. कोरोनानंतरच्या काळात जग बदलणार आहे ते असं..



( प्रसाद मुक्त पत्रकार/तंत्रज्ञानविषयक लेखक आहे.)

 

Web Title: Self-driving cars - neolix van

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.