Ðiwali Detox - दिवाळीत ताजेतवाने होण्याचा भन्नाट उपाय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 07:25 AM2019-10-24T07:25:09+5:302019-10-24T07:30:05+5:30

दिवाळीचे चार दिवस मस्त खा-प्या, मजा करा आणि ते करताना जरा आपल्या मनावरची, ताणावरची पुटंही काढता आली तर पाहा.

Oiwali Detox - How to be fresh & relax in Diwali. | Ðiwali Detox - दिवाळीत ताजेतवाने होण्याचा भन्नाट उपाय!

Ðiwali Detox - दिवाळीत ताजेतवाने होण्याचा भन्नाट उपाय!

Next
ठळक मुद्देलोकमत ऑक्सिजनच्या सर्व वाचक मित्र-मैत्रिणींना दिवाळीच्या शुभेच्छा.! Happy Diwali.

-ऑक्सिजन टीम

दिवाळीची खरं तर तशी आजच सुरुवात.
आज वसूबारस, उद्या धनत्रयोदशी.
दिवाळी येणार म्हणून घरीदारी आनंदाचं वातावरण आहे.
साफसफाई मोहिमा कधीच झाल्या, जुने माळे खाली आले, त्यातल्या नकोशा वस्तू बाहेर टाकून देण्यात आल्या, सगळीकडे हात फिरला, सगळं कसं लख्खं, चकचकीत आणि देखणं झालं.
आता आकाशकंदील उजळलायला लागले. लायटिंगच्या माळा मढून बसल्या आणि सगळीकडे रोषणाईच रोषणाई झाली.
या सार्‍या रोषणाईत आणि प्रसन्न प्रकाशात आपल्या मनावरही साचलेला ताण पुसला जावा, मनावरची काजळी निपटून काढावी आणि मस्त तजेलदार प्रसन्न मनानं जगून घ्यावा सण असं आपल्यालाही वाटतंच.
हल्ली तर स्ट्रेस, चिडचिड, अ‍ॅन्झायटी आणि उदास झाक ही अधनंमधनं घेरतेच आपल्याला. त्यातून सावरायचं कसं हे अनेकदा कळत नाही. तात्पुरती मोटिव्हेशनल पुस्तकं वाचली तर बरं वाटतं; पण ते काही आत झिरपत नाही, मुरत नाही आणि पुन्हा निराश झाक मनाला कोमेजून टाकते.
मग वाटतं दिवाळी आली असेल तर त्या दिव्यांचा मंद प्रकाश आपल्याही मनात आणि आयुष्यात उजळावा. आपल्यालाही लाभावेत चार निवांत क्षण, रिलॅक्स करता यायला हवं, शांत-आनंदी वाटावं.
पण ते कसं वाटावं?
त्यासाठी आपण जशी घराची साफसफाई करतो तशी आपल्या मनाचीही करायला हवी आणि रांगोळीत रंग भरावेत तशा काही खास गोष्टी मुद्दाम करून, आपल्याही रोजच्या जगण्यात रंग भरावेत.
एकीकडे काजळी काढायची, जळमटं झटकायची आणि दुसरीकडे छान  रंग भरायचे तर निदान या दिवाळीच्या दिवसांत तरी काही गोष्टी करायला हव्यात.
त्याला म्हणता येईल दिवाळी डिटॉक्स.
अलीकडे एक नवीन ट्रेण्ड आहे, ज्यात दिवाळीत भरपूर खाऊन झाल्यानंतर अनेकजण दिवाळी डिटॉक्स करतात. म्हणजे फक्त फळं खातात, ज्यूस पितात, पाणी भरपूर पितात असं बरंच काही करून, जे खाल्लं त्याचा अपराधभाव कमी करण्याचा प्रयत्न करतात.
मात्र आता त्याच्या पुढे जात दिवाळीच्या चार दिवसांतच डिटॉक्सचा विचार करणंही सुरू झालं आहे. जे म्हटलं तर पारंपरिक आहे म्हटलं तर आधुनिक.
त्या ट्रेण्डमधल्या या काही मुख्य गोष्टी.
1. इट ट्रॅडिशनल
ट्रेण्डचं नाव जरी इंग्रजी वाटलं तरी त्याचा मतितार्थ एवढाच की जे फराळाचे पदार्थ आपल्या आया,आज्या दिवाळीत करतात, ते दणकून खा. फराळाचं नको, वजन वाढतं म्हणून पावभाजी नी सॅण्डविच खाण्यात काही अर्थ नाही. उलट थंडीच्या दिवसांच्या सुरुवातीस लाडू-शंकरपाळे-करंज्या हे स्निग्ध पदार्थ खाणंच उत्तम. त्यामुळे जे पारंपरिक ते खाणं हा या दिवाळीतला नियम.

2.हॅण्डमेड
आजकाल ऑनलाइन काय मिळत नाही. बाजार तर वस्तूंनी भरलेले आहेत. त्यामुळे गिफ्ट देताना उगीच बाजारातून आणून काही गिफ्ट देण्यापेक्षा मस्त स्वतर्‍ बनवा. त्यातून दोन गोष्टी होतात, आपण स्वतर्‍ काही बनवलं म्हणून आपल्या कल्पनाशक्तीला चालना मिळते आणि उत्तम वेळ जातो म्हणून मनालाही छान हलकं वाटतं. गिफ्ट ज्याला द्यायचं त्याला स्पेशलही वाटतं. 

3. गप्पांचे अड्डे
दिवाळीचे सेल्फी, ग्रुपी काढून भले तर टाका विविध ग्रुप्सवर. पण पूर्वी लहानपणी सगळी भावंडं जमत तसे गप्पांचे फड जमवा, पत्ते कुटा, बदाम सात आणि झब्बू खेळा. त्यातून जे मस्त वाटेल ते सोशल मीडियातल्या लाइक्सने वाटत नाही.

4. अभ्यंग आणि व्यायाम
दिवाळीत अभ्यंग स्नानाची परंपरा आहेच. तेव्हा उशिरार्पयत झोपून न राहता मस्त तेल मालिश करून, व्यायाम करून दिवाळीचे दिवस सुरू करा. हा एक उत्तम डिटॉक्स आहे.

5. सोशल मीडियाचा उपवास,
हा डिटॉक्स तसा अवघड आहे; पण जमल्यास दिवाळीचे चार दिवस सोशल मीडियाचा उपवास करून पाहा. त्यानं खर्‍या आयुष्यातही चांगले लोक आहेत याची ओळख होऊ शकेल.

 

Web Title: Oiwali Detox - How to be fresh & relax in Diwali.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.