a journey of satisfaction! | कॉफीचा मग, स्वातंत्र्य आणि कौतुक!
कॉफीचा मग, स्वातंत्र्य आणि कौतुक!

ठळक मुद्देसुख, समाधान म्हणजे नक्की आहे तरी काय?

-श्रुती साठे

सुख, समाधान म्हणजे नक्की आहे तरी काय?
फेसबुक वर दिवसाला असंख्य अपडेट्स  येत असतात- बरेचदा आपण सेकंदात या पोस्टवरून त्या पोस्टवर उडय़ा मारतो. 
कित्येकदा कोणी युरोप ट्रिपचे, मालदीवच्या समुद्राकिनार्‍याचे फोटो शेअर करतो.
आपण त्यावर कॉमेंट करतो, फोटो लाईक करतो आणि त्या ठिकाणी एकदा जायचंय अशी मनाशी खूणगाठ बांधतो. आणि ऑलरेडी भरगच्च असलेल्या विश लिस्टमध्ये  अजून एका टुडूची भर टाकतो!
**
अशाच पोस्ट्सच्या गर्दीत एक पोस्ट डोळ्याखालून जाते.
आणि मनात घर करून बसते. 
त्यात कुणीतरी विदेशी मुलगी अगदी सहज सांगत असते.
माझ्या आईला कॉफी मग्ज जमवायचा छंद आहे.
आईचा हा छंद माझ्या बाबांना कधीच आवडला नाही. 
याउलट आईच्या नवीन बॉयफ्रेण्डने त्याच सगळ्या मग्जसाठी 
भिंतभर जागा तयार केली!   
अशा काही पोस्ट्स पाहिल्या की वाटतं,  सुख म्हणजे नक्की काय?
**
दुबईच्या राजाच्या राण्यांपैकी एक, त्याला सोडून पळून गेली. याच राजाच्या एका मुलीनेसुद्धा मागच्यावर्षी पलायनाचा प्रयत्न केला अशी बातमी होती.
काय कमी असेल या दोघींकडे? सौंदर्य, पैसा, आलिशान मोठं मोठी घरं, डिझायनर कपडे, ज्वेलरी ! आपण ज्या गोष्टींची स्वप्नंसुद्धा पाहत नाही असे उंची राहणीमान, नोकर चाकर - सगळं सगळं. याच राजाच्या मुलीने स्वतर्‍चा एक व्हिडीओ शेअर केला, त्यात ती म्हणते तिला स्वातंत्र्य नव्हतं, कोणालाच तिची काळजी, फिकीर नव्हती. तिला काय वाटतं हे घरी कोणालाच जाणून घायची इच्छा आणि वेळ नव्हता !
 ***
वरच्या नमूद केलेल्या स्रियांमध्ये न जाणो एक साम्य दिसतं. पैसा हे सुखाचे माध्यम असू शकेल; पण सुख नक्कीच नव्हे ! याउलट सुख हे आपलेपणांत, आपले छंद जोपासण्यात, कौतुक करण्यात आणि करून घेण्यात, एखाद्या वर जिवापाड प्रेम करण्यात, त्या व्यक्तीची काळजी करण्यात असते. कोणाला आपले कौतुक झालेले, आपली कदर केलेली नाही आवडणार? 
***
हल्लीच्या तरु ण मुली ज्या मुलांइतक्याच शिकलेल्या, मोठय़ा पगाराची नोकरी करणार्‍या असतात. काही जणी वेळात वेळ काढून यू टय़ूबवर पाहून घरच्यांसाठी वेगवेगळे पदार्थ करतात. यावेळी अपेक्षित असतात सासूसासरे आणि नवर्‍याकडून चार कौतुकाचे शब्द ! जर घरचे इतकंही करू शकत नसतील तर त्या सुशिक्षित असण्याचा, गलेलठ्ठ पगाराचा काय उपयोग?
***
आता काही नवरे म्हणतात, माझं प्रेम आहे बायकोवर; पण ते मला व्यक्त करायची गरज वाटत नाही!
आता या वाक्याला काय अर्थ उरतो जर ते प्रेम कळलंच नाही तर?
 यापेक्षा चार प्रेमाचे शब्द, छोटय़ा छोटय़ा गोष्टींचे कौतुक करणे, कधीतरी छान गुलाब आणणं, कधीतरी तिचा /त्याचा आपणहून फोटो काढणं, आपल्याला आवडतो तो ड्रेस घाल असा प्रेमळ हुकूम सोडणं, रात्नीच्या जेवणानंतर हातात हात घेऊन फिरायला जाणं ! करा ना थोडी  मेहनत, व्हा थोडे रोमॅण्टिक- कुठे बिघडलं? रोमॅण्टिक व्हायचा मक्ता काय फक्त सिनेस्टार्सचाच आहे? 
बरं हेच दोघांनाही लागू पडते. 
तुम्ही दोन पावलं पुढे आला की तुमचा जोडीदार चार पावलं पुढे येईल!
***
काही जण म्हणतात काय प्रेमाचे संवाद साधायचे. कळेल तिला माझ्या मनातलं हे म्हणजे आपल्या जोडीदाराला गृहीत धरणं झालं ! ऑफिसमध्ये जाताना डबा घेऊन जातात, मग त्यामागच्या कष्टाचं कौतुक रोज केलं तर कुठे बिघडलं? 
बस, हेच ते सुख!
ज्यासाठी माणसं आसुसलेली असतात. गोष्टी छोटय़ा असतात.
पण अनेकदा घडत नाही.
तसं होऊ नये.
करावा प्रसंगी आपणच पुढे एक हात पुढे. 

 

Web Title: a journey of satisfaction!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.