त्यानं पुढच्या स्पर्धकाला फिनिशिंग लाइनच्या पुढे ढकललं, आणि  .. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 05:47 PM2020-08-13T17:47:18+5:302020-08-13T17:52:20+5:30

जिंकण्याची एक भलतीच भन्नाट गोष्ट !

He pushed the next contestant to the finish line, won the race of integrity | त्यानं पुढच्या स्पर्धकाला फिनिशिंग लाइनच्या पुढे ढकललं, आणि  .. 

त्यानं पुढच्या स्पर्धकाला फिनिशिंग लाइनच्या पुढे ढकललं, आणि  .. 

Next

- सारिका पूरकर -गुजराथी

तयारी जीत की.
म्हणत मुलाला सगळ्याच शर्यतीत पहिलंच यायला शिकवणा:या आईची जाहिरात पाहिली असेलच ना?
वाट्टेल ते करून जिंकाच असं जाहिराती, मार्केट, व्यवस्था, समाज, पालकही आपल्या मुलांना सतत सांगत असतात.
थ्री इडियट्समधला व्हायरसही मुलांना हेच शिकवत असतो, भागो, लाइफ अ रेस! जो दुसरा आता है, उसे कोई याद नही करता.
मात्र गेल्या काही दिवसांत तुमच्याही र्पयत एक फॉरवर्ड आलं असेल, ज्यात पहिल्या आलेल्यापेक्षा दुस:याच्या खिलाडू वृत्तीचं, मोठय़ा मनाचं, दिलदारीचं आणि माणूसकीचं दर्शन होतं आहे.
बाकी आमजनतेसह आर. माधवननेही त्याची स्टोरी सोशल मीडियात अकाउण्टवर शेअर केली. 
दरम्यान केरळमधील अलानाल्लूर या गावातील एका प्राथमिक शाळेतील मुलांनी तर त्याला चक्क पत्रं पाठवलीय, त्याच्यावर निबंधदेखील लिहिले.
अर्थात 2020 ची नाही, कोविडपूर्व काळातली डिसेंबर 2012 ची ही गोष्ट आहे.
तो स्पेनचा धावपटू इव्हान फर्नांडिज अनाया. स्पेनधील बुर्लाडा येथे धावण्याची क्रॉस कंट्री स्पर्धा झाली होती. केनियाचा चॅम्पियन धावपटू हाबेल किप्रोप मुताई हा या रेसमध्ये अग्रभागी होता. निर्विवादपणो स्पर्धेचा तोच विजेता होणार होता; परंतु मुताईला स्पर्धेच्या फिनिशिंग लाइनचा अंदाज आला नाही व स्पर्धा संपली असे समजून 1क् मीटर अंतर आधीच तो थांबला. त्याच्या किंचित मागे दुस:या 
क्र मांकावर होता स्पेनचा इव्हान फर्नाडिज अनाया. त्याच्या हे लक्षात आलं, की मुताईला स्पर्धेचा शेवट समजलेला नाहीये. 
आता खरं तर झटकन पुढे जाऊन स्पर्धा जिंकण्याची, सुवर्णपदक पटकाविण्याची नामी संधी इव्हानकडे चालून आली होती; पण इव्हानने तसं केलं नाही. तो मुताईकडे पाहून जोरजोरात ओरडू लागला, थांबू नकोस, तू धावत राहा, स्पर्धेचा शेवट हा नाहीये, तू जिंकू शकतोस. गंमत अशी होती, की मुताईला स्पॅनिश भाषा समजत नव्हती. त्याला समजतच नव्हते हे काय चालेलय ते? इव्हानच्याही लक्षात आले की, मुताईला त्याची भाषा समजत नाहीये. त्याने अखेर मुताईला फिनिशिंग लाइनच्या पलीकडे अक्षरश: स्वत:हून ढकलून दिले. अशा रीतीने मुताईच सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. 
घडलं ते अचंबित करणारंच होतं उपस्थितांसाठी. खेळाच्या मैदानात सहसा असं होताना पाहिलं नव्हतं कुणी.ज्याला त्याला विजयी व्हायचं असतं. बक्षीस उंचवायचं असतं. इव्हानला चांगली संधी असतानाही त्याने मात्र ते नाकारलं होतं.
स्पर्धेनंतर पत्रकारांनी विचारलेल्या तू असं का केलंस, तू सहज जिंकू शकला असता?
या प्रश्नाला इव्हानने उत्तर दिलं होतं, मी जर तसं केलं असतं तर त्या विजयाला काही अर्थ उरला असता का? त्या सुवर्णपदकाचा मान राखला गेला असता का? माङया आईला काय वाटलं असतं माङयाबद्दल? माङया देशाला माझा अभिमान वाटला असता का? तसंही मी त्याला विजयी केलंच नाहीये, तो विजय, ती स्पर्धा त्याचीच होती. एवढय़ावरच इव्हान थांबला नाही, तर तो म्हणाला, माझं तर स्वप्नं आहे की आपण असं काही करू की आपण स्वत:ला बाजूला फेकत इतरांना विजयी करत जाणारे, एकमेकांना सोबत घेऊन जाणारं समाजमन तयार करू.
जिंकणं याहून वेगळं काय असतं?
विशेष म्हणजे, ज्या काळात स्पर्धा, स्वत:चं अस्तित्व, जिंकणं अधिक महत्त्वाचं त्या काळात अशा गोष्टी, असे प्रसंगच जगण्याची योग्य वाट दाखवतात.

आता येऊ वर्तमानात.
केरळच्या शाळेत शिक्षिका सुमिथा के यांनी मुताई यांनी तो जिंकण्याचा फोटो मुलांना दाखवून ही गोष्टही सांगितली.
पाठय़पुस्तकात, कोणत्याही अभ्यासक्रमात या फोटोचा, या गोष्टीचा समावेश नव्हता; पण तरीही या मुलांना यातून जगण्याचा आनंदी धडा मिळाला. सुमिथा यांच्या या प्रयत्नांचे कौतुक केरळ राज्याचे वरिष्ठ शिक्षण सल्लागार टी.पी. कलाधरन यांनीही त्यांच्या ब्लॉगमध्ये केलं.
ुकाळ बदलतो, संदर्भ बदलतात; पण मानवी जगण्यातली ही सच्ची मूल्ये आणि आनंद नव्या काळातही अशी भेटतच राहतात.

 

Web Title: He pushed the next contestant to the finish line, won the race of integrity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.