Drought of information, questions and answers too | माहितीचा,प्रश्नांचा आणि उत्तरांचाही दुष्काळ
माहितीचा,प्रश्नांचा आणि उत्तरांचाही दुष्काळ
- विकास भीमराव वाघमोडे 
 
खरंच दुष्काळ म्हणजे फक्त पाणीटंचाईच का?
दुष्काळ म्हटला की कडक उन्हाचा तडाखा, भेगा पडलेली शेतं, चातक पक्ष्याप्रमाणो ढगाकडे पावसाची वाट पाहत बसलेला एक म्हातारा असे फोटो आपण वृत्तपत्रंत कायम पाहिलेले असतात.
मी दोन महिने या मोहिमेत पूर्णवेळ काम करायचं ठरवलं आणि मराठवाडय़ात पोहचलो. ज्याच्यावर ‘ऊस तोडणीवाल्यांचा जिल्हा’ असा शिक्का आहे, त्या बीड जिल्ह्यातील नित्रुड (ता. माजलगाव) या गावी मी काम केलं. काम करण्याआधी ‘दुष्काळ विरुद्ध पाणी’ असंच एक चित्र माङया मनात होतं. पाणी नाही तो दुष्काळ. परंतु प्रत्यक्ष काम करताना माझी दुष्काळाविषयी संकल्पनाच बदलली. 
खरंच दुष्काळ म्हणजे फक्त पाणीटंचाईच का? माङया मते खरंतर दुष्काळ म्हणजे एखाद्या गोष्टीचा अभाव. मग तो रोजगाराचा असेल, शिक्षणाचा असेल, सरकारी योजनांचा असेल, नाही तर स्वत:च्याच गावामध्ये ऊसतोडणीनंतर परत आल्यावर न मिळणा:या विकासाचा. 1क् एप्रिल 2क्15, प्रथमच या भागात आलो आणि तेही काहीतरी आव्हानात्मक करायचं आहे असं ठरवून. गाव फिरताना सर्वत्र दिसली ती उदासीनता. बस स्टँडवर निवांत बसलेले लोक (वयोवृद्ध फक्त, कारण तरु णवर्ग ऊसतोडणीसाठी स्थलांतरित झाला होता), शेतात दिसलं ते वाळलेलं कापसाचं पीक. हे सर्व पाहताना मनात एकाच प्रश्नाचा कल्लोळ माजला ‘आपण खरंच स्वतंत्र झालोय का?’ या लोकशाहीप्रधान देशात ज्या विकासाच्या योजनांसाठी एवढा अमाप पैसा खर्च केला जातो त्या योजना खरंच तळातील लोकांपर्यंत पोहचल्या आहेत का?
मग तेव्हाच ठरवलं  6क् दिवस आपल्याकडे आहेत. या 6क् दिवसांत किमान सहा समस्या तरी आपल्यापरीने समजून घेऊन त्यावर काहीतरी उपाययोजना करायच्या. एक समस्या सोडवायला घेतली आणि दुसरी समस्या दिसत गेली. रोजगार हमी योजना गावात सुरू करायची या एकाच समस्येवर भर दिला होता. आणि त्याच वेळी इतर समस्या दिसल्या. 
गावात फिरताना एक जाणवलं की, दलित आणि मुस्लीम वस्तीमध्ये विकासाचा खूप अभाव आहे. मग ठरवलं, फक्त या दोन वस्तीमधील लोकांमध्ये जागृती करायची. येथीलच समस्या जाणून घ्यायच्या. मुस्लीम वस्तीमधील लोकांमध्ये जागृती करताना लोक जास्त संवाद करत नव्हते. मग मशिदीत जाऊ लागलो. त्यामुळे नंतर जाणवलं की लोक बोलू लागले.
रोजगार हमी योजनेची ब:यापैकी जागृती केली. मग लोक स्वत:हून भेटायला लागले. गावातीलच एका जोडप्याने (बाळासाहेब व वर्षाताई आवाड) खूप मदत केली. मात्र इथंच कळलं की, ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ म्हणजे काय असतं.  ग्रामसेवक ते तहसीलदार सर्वाना भेटून सतत सांगावं लागायचं. एवढं करून येऊ घातलेल्या पावसाळ्यामुळे काम काही सुरू झाले नाही. फक्त कामाचे अंदाजपत्रक तेवढे तयार झाले. 
रोहयो जागृतीसाठीच गावात फिरताना एका बाईने तिचे वीजबिल सांगितले 13 हजार रुपये. मी तिचे वीजबिल पाहिले तर त्यावर मीटरचा फोटोच नव्हता. मग वस्तीमधील ब:यापैकी लोकांची बिलं पाहिली, तर गेल्या दोन वर्षात फक्त डिसेंबर महिन्यातीलच बिलांवर मीटरचा फोटो होता. मग ऑनलाइन आणि कार्यालयात जाऊन तक्रार दिली. त्यानंतर कार्यालयाने ज्या ठेकेदाराला फोटो काढण्याचा ठेका दिला होता, त्याच्या जागी नवा ठेकेदार नेमल्याची माहिती मिळाली. 
आरोग्य केंद्राचे उपकेंद्र तर लसीकरणाव्यतिरिक्त चालूच नसायचे. मग ऑनलाइन आणि तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. या समस्येचं काय झालं हे प्रत्यक्ष पाहायला मी गावात राहू शकलो नाही; पण हे उपकेंद्र अधूनमधून उघडू लागल्याचं आता लोकांच्या फोनवरून कळतंय.
इथला सगळ्यात मोठा प्रश्न होता ऊसतोडणीसाठी होणा:या स्थलांतराचा. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा कसा होतो, शेतीचं नुकसान कसं होतं हे समजलं. 
ऊसतोडणीवरून गावाकडे परतताना अपघातामुळे एक बाई पूर्णपणो झोपून आली होती. तिला कोण मदत करणार? मग जाणवलं की जर या बाईचा अपघाती विमा असता तर तिला पैसे मिळाले असते. त्याच वेळी पंतप्रधानांनी दोन विमा योजनांची घोषणा केली होती. त्याबाबत मग जागृती केली. चक्क लोकांनी दुस:याच दिवशी बॅँकेमध्ये जाऊन पैसे भरले.
भ्रष्टाचाराचे तर अनेक अनुभव मला या काळात जवळून पाहता आले, काहीतर अनुभवता आले.  समस्या सोडवता सोडवता मला  एकच समजलं की, समस्या म्हणजे सृजनशीलतेचा अभाव. जरा वेगळा विचार, माहिती, योग्य प्रश्न या सा:याचाही गावखेडय़ात दुष्काळच आहे.
आणि तो दुष्काळ कसा हटवायचा, हादेखील महत्त्वाचा प्रश्न आहेच!

Web Title: Drought of information, questions and answers too
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.