कर्णबधिर तारुण्य लॉकडाऊन काळात करतंय अडचणींचा सामना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 01:29 PM2020-06-18T13:29:55+5:302020-06-18T13:32:20+5:30

त्यांना ऐकू येत नाही. ते एकतर लिपरीड करतात किंवा चेह:यावरचे हावभाव वाचून साइन लॅँग्वेजसह संवाद साधतात. मात्र लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या अडचणी वाढवत आहेत.

Deaf youth face difficulties during lockdown | कर्णबधिर तारुण्य लॉकडाऊन काळात करतंय अडचणींचा सामना 

कर्णबधिर तारुण्य लॉकडाऊन काळात करतंय अडचणींचा सामना 

Next

-अर्चना कोठावदे, विशेष शिक्षिका, माई लेले श्रवण विकास विद्यालय, नाशिक

कोरोना काळाने सा:या जगाला, मानवी जगण्यालाच परीक्षेला बसवले आहे.
हातीपायी धड असलेली, मात्र रोजगार गमावून बसलेली अनेक माणसं उदास आहेत. पर्याय शोधत आहेत. प्रश्न गंभीरच आहेत.
मात्र दिव्यांग व्यक्तींचं रोजचं जगणंही धडधाकट माणसांपेक्षा कठीण असतं. 
त्यांच्या समोर येणा:या अडचणी जास्त गंभीर आणि सोडवायला जास्त कठीण असतात. 
अनेक प्रकारचं अपंगत्व माणसांच्या आयुष्यात येऊ शकतं. हात किंवा पाय नसणं, सक्षमपणो हालचाली करता न येणं, दृष्टिहीनता, कर्णबधिर असणं अशी त्याची अनेक रूपं असू शकतात.
मात्र त्यापैकी सगळ्यात उपेक्षित व्यंग कुठलं असेल तर ते कर्णबधिर असण्याचं. 
त्यामागचं सगळ्यात मोठं कारण हे की इतर व्यंग डोळ्यांना दिसतात, व्यंग असलेल्या व्यक्तीचा साध्या साध्या कृती साध्य कारण्यासाठीचा संघर्ष दिसतो. पण कर्णबधिरपणाचं तसं होत नाही.
मुळात एखादी व्यक्ती कर्णबधिर आहे हे नुसतं तिच्याकडे बघून लक्षात येत नाही. पण तिच्याशी संवाद साधायला गेल्यावर ते लक्षात येतं. त्यातही त्या व्यक्तीला आपलं म्हणणं काही प्रमाणात समजतं, काही प्रमाणात समजत नाही. त्यावर ती व्यक्ती वेगळ्याच काहीतरी प्रतिक्रिया देते. मग सर्वसामान्य माणसाला वाटतं, समोरच्या दिव्यांग व्यक्तीची समज कमी आहे. त्यातूून अनेकदा धडधाकट व्यक्ती कर्णबधिर व्यक्तीला मतिमंद असल्यारखी वागणूक देते आणि मग दोन्ही बाजूंनी असणारे गैरसमज वाढतच जातात.
असं होतं, कारण बहुतांश कर्णबधिर लोक भाषिकदृष्टय़ा पूर्ण विकसित होत नाहीत. शाळेत जाऊन, प्रशिक्षण घेऊन ते भाषा शिकतात खरे; पण लहान मूल नकळत्या वयापासून भाषा ऐकतं आणि आपोआप सहज शिकतं, ती प्रक्रिया कर्णबधिरांच्या बाबतीत घडत नाही. त्यामुळे त्यांचा भाषिक विकास होत नाही. भाषा अविकसित राहिल्यामुळे कुठल्याही प्रकारचा संवाद साधायला त्यांना अडचणी येत राहतात. त्यांची नेमकी अडचण काय आहे हे धडधाकट व्यक्तींना कळत नाही.
या सगळ्या गैरसमजातून आधीच कठीण असलेलं कर्णबधिरांचं आयुष्य अजूनच खडतर होत जातं. अशातच आता भर पडली ती अचानक आलेल्या लॉकडाऊनची आणि कोरोनामुळे बदललेल्या लाइफस्टाइलची. 
कोरोनाच्या भीतीमुळे सर्वसामान्य माणसांचं आयुष्यच उलटंपालटं झालेलं असताना कर्णबधिरांच्या अडचणी अजूनच वाढलेल्या आहेत. पण तरीही ही मंडळी त्यातून नेटाने मार्ग काढतायत, कारण परिस्थितीशी दोन हात करणं हीच त्यांची लाइफस्टाइल आहे.
कर्णबधिर व्यक्तींना बदललेल्या वातावरणाशी जुळवून घेणं कठीण जातं. अॅडजस्ट होण्याचा स्पीड कमी असतो. 
कारण भाषा आकलनाची कमतरता असते, त्यात समजावून सांगणारी व्यक्ती जवळ नसते.
सामान्य माणसांइतकी सहज माहिती मिळत नाही. मिळालेली माहिती त्या स्पीडने प्रोसेस होत नाही.
मोठय़ा कर्णबधिरांचे पालक सीनिअर सिटिझन्स आहेत. तेही या मुलांना माहिती देऊ शकत नाही.
भाषेचे बारकावे कळत नाहीत. खूप कमी मुलं भाषिकदृष्टय़ा पूर्ण डेव्हलप होतात. त्यामुळे मोबाइलवर आलेले मेसेज पूर्णपणो समजत नाहीत.
5क् टक्के मुलं लिपरीडिंगवर अवलंबून असतात. मास्क लावल्यामुळे त्यांना नॉर्मल संवाद साधायलाही अडचण येतात.
लॉकडाऊनमुळे कर्णयंत्रंचे सेल्स मिळाले नाहीत. अचानक टाळेबंद झाल्यामुळे सेल साठवून ठेवलेले नव्हते. त्यानं ऐकू येणं बंद झाल्याने गडबड झाली.

मग उत्तरं काय शोधली?
*अनेकजण एकमेकांना धरून राहिले. त्यांचे ग्रुप्स आहेत. जिथे नसतील तिथे त्यांनी ग्रुप्स बनवून एकमेकांना आधार दिला.
* त्यांना समाजातील अशा भाषेतले मेसेजेस आपापसात फिरवतात.
*पूर्ण निरक्षर कर्णबधिरांना सुशिक्षित कर्णबधिर व्हिडिओ करून पाठवतात.

.काय मदत करता येईल?

* कर्णबधिरांना मदत करायची, संवाद साधायची तयारी असेल तर
साइन लँग्वेज आलीच पाहिजे असं काही नाही.
* कर्णबधिर लोकांबरोबर दोन-चार दिवस घालवले तरी त्यांच्या खाणाखुणा सहज समजू शकतात.
* मदत करता नाही आली तरी समाजाने त्यांना त्रस देऊ नये.
* कर्णबधिर मुलांशी/तरुणांशी आपणहून संवाद साधलात तर 2-3 संवादांमध्ये त्यांच्याशी उत्तम संवाद होऊ शकतो. 


(मुलाखत आणि शब्दांकन- गौरी पटवर्धन)

 

कर्णबधिर लोकांसाठी संवादाचे साधन म्हणजे साइन लॅँग्वेज. 
कोरोनामुळे आपल्याला सतत मास्क वापरावा लागणार असल्याने चेह:यावरचे हावभाव दिसत नाहीत. 
कर्णबधिर तरुणांना स्वत: मास्क लावल्यामुळे फारशी अडचण येत नसली तरी साइन लॅँग्वेजमध्ये संवाद साधताना समोरच्या चेह:यावर काय हावभाव आहेत, हे कळत नाही.
त्याचबरोबर लिपरीडिंगलासुद्धा अडचणी येतात. त्यामुळे अनेकदा मिसकम्युनिकेशनसुद्धा होते.
सध्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोक:या जात आहेत.
जे कर्णबधिर नागरिक विविध खासगी संस्थांमध्ये कामाला होते, त्यांनादेखील आपला रोजगार सोडावा लागला. 
परंतु जे लोक सरकारी आस्थापनांमध्ये कामाला आहेत, त्यांना कामावर जावे लागते. अशातच साइन लॅँग्वेज इतरांना येत नसल्याने कोरोनाच्या काळात त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. एखादी बस कोठे चालली आहे. कुठले तिकीट हवे आहे याबाबतच संवाद साधतानाही अडचणी येत आहेत.
तसेच एखाद्याला कोरोनाची लक्षणो दिसल्यास ती डॉक्टरांना सांगण्यातसुद्धा अडचण निर्माण होते आहे.
अनेकदा डॉक्टरांना हे नागरिक काय म्हणतात हे चटकन कळत नाही. 
त्यामुळे निदान होण्यास वेळ लागतो. राज्यस्तरीय कर्णबधिर असोसिएशन या तरुणांना मदत करण्याचा प्रयत्न करते आहे.

प्रदीप मोरे आणि तस्लीम शेख. 
राज्यस्तरीय कर्णबधिर असोसिएशन


 

Web Title: Deaf youth face difficulties during lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.