काळ्यासावळ्या रंगावरून तुम्हीही टोमणा ऐकलाय ? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 03:53 PM2020-07-02T15:53:34+5:302020-07-02T15:55:52+5:30

हा रंग नको, तुला काही खुलणार? डार्क स्किनला नाही अमुक शोभत हे आपण सर्रास ऐकलेलं असतं. इतरांनी बदल करण्याऐवजी आपण स्वत:च्या या मानसिकतेत कधी बदल करणार?

being black or fair, why we are obsessed with white skin tone? | काळ्यासावळ्या रंगावरून तुम्हीही टोमणा ऐकलाय ? 

काळ्यासावळ्या रंगावरून तुम्हीही टोमणा ऐकलाय ? 

Next
ठळक मुद्दे पुढे न्यायचं का रिव्हर्स टाकून पुन्हा मागे जायचं हा निर्णय आपण, समाजाने घ्यायचा आहे!

- गौरी पटवर्धन

गेल्या काही दिवसात दोन वाक्यांची जगभरात चर्चा होती. सगळा सोशल मीडिया त्या दोन वाक्यांनी भरून गेला होता. 
त्यातलं पहिलं वाक्य होतं, ‘‘आय कान्ट ब्रीद’’ आणि दुसरं वाक्य होतं, ‘‘ब्लॅक लाइव्हज मॅटर’’. 
या दोन्हीचं सोशल मीडियाच्या पद्धतीप्रमाणो हॅशटॅगमध्ये रूपांतर झालं. त्यातला ब्लॅक लाइव्हज मॅटर हा हॅशटॅग खूप काळ ट्रेण्डिंग राहिला. व्यवस्थेतील वर्णवर्चस्ववादी गो:या अधिका:याने केलेल्या काळ्या कातडीच्या माणसाच्या खुनाविरुद्ध सगळं जग एकवटलं. 
कोविड-19च्या भीतीच्या सावटाखाली असतानाही जगात ठिकठिकाणी माणसं निदर्शनं करण्यासाठी एकत्न आली. आणि त्या निमित्ताने त्वचेचा रंग या हा जुनाच मुद्दा पुन्हा चर्चेत आला.
विचार करणा:या कुणाही व्यक्तीला त्वचेचा रंग हा विषय कितीही फालतू आणि उथळ वाटत असला, तरी आज दुर्दैवाने जगातल्या अनेक हिंसाचाराच्या मुळाशी त्वचेचा रंग आणि तशीच कारणं असतात हे सत्य आहे. त्यातले काही हिंसाचार शारीरिक असतात. ते सगळ्यांना दिसतात, त्याविरुद्ध आवाज उठवला जातो, चळवळी उभ्या केल्या जातात, दाद मागितली जाते. या सगळ्या प्रयत्नांना काही वेळा यश येतं, काही वेळा येत नाही; पण निदान या शारीरिक हिंसाचाराची दखल तरी घेतली जाते. पण जगातल्या सगळ्या माणसांना विळखा घालून बसलेला अजून एक हिंसाचाराचा प्रकार आहे, आणि तो म्हणजे मानसिक आणि भावनिक हिंसाचार ! हा प्रकार जितका इतर जगात आहे त्यापेक्षा कणभर जास्तच भारतात आहे.
भारतातील लख्ख गोरी माणसं सोडली, तर प्रत्येक भारतीय व्यक्ती या मानसिक हिंसाचाराला तोंड देत असते. ज्यांच्या त्वचेचा रंग गहूवर्णी आहे त्यांना त्याचा त्नास थोडा कमी होतो. पण त्यानंतरच्या सर्व त्वचेच्या रंगांना आपल्याकडे मानसिक हिंसाचाराचा सामना करावा लागतो. जिचा रंग सावळा ते काळा या रंगछटेत मोडतो अशी कोणतीही व्यक्ती डोळ्यासमोर आणा. तिने कधी ना कधी त्वचेच्या रंगावरून टोमणो ऐकलेले असतात, अपमान सहन केलेला असतो.
‘‘हा रंग काळ्या लोकांना सूट होत नाही.’’
‘‘रंग पक्का आहे. कसं लग्न जमणार आहे कोणास ठाऊक?’’
इथपासून ते त्यांची त्वचा सावळी किंवा काळी असल्यामुळे त्यांच्या कौशल्याबद्दल, शिक्षणाबद्दल, क्षमतेबद्दल शंका उपस्थित केली जाते.
या सगळ्याला सतत खतपाणी घालत असतात ते दोन घटक म्हणजे समाज आणि बाजारपेठ!
समाजात वावरताना, विशेषत: लग्न जुळवताना मुलाच्या, आणि त्याहूनही मुलीच्या त्वचेचा रंग हा सगळ्यात महत्त्वाचा घटक होऊन बसतो. सगळ्या मुलांना ‘‘गोरी आणि सुंदर’’ मुलगी लग्नासाठी पाहिजे असते. गो:या मुलींचं लग्न लवकर जमतं. सावळ्या मुलींना लग्न जुळवताना जास्त तडजोडी कराव्या लागतात. काळ्या मुलींना तर जे स्थळ सांगून येईल ते स्वीकारावं लागतं. कधी कधी तर त्यांना स्थळ सांगून येतच नाही.


भारतासारख्या देशात, जिथे मुलीचं लग्न होणं हा तिच्या आयुष्याचं सार्थक होण्याचा एकमेव मार्ग समजला जातो तिथे या गोरेपणाच्या वेडाचा फायदा बाजारपेठेने घेतला नसता तरच आश्चर्य होतं. मग अर्थातच जिकडेतिकडे चार दिवसात किंवा चार महिन्यात गोरं करणा:या क्रीम्सचं पेव फुटलं. रंग गोरा झाल्यामुळे कसं लग्न जमतं, आत्मविश्वास वाढतो, नोकरी मिळते असल्या जाहिराती सुरू झाल्या. काळ्या आणि गो:या रंगातील फरक दाखवून क्रीम्स विकून झाल्यावर गो:या आणि गो:या रंगातला फरक दाखवण्याची स्पर्धा सुरू झाली. इतरांच्या क्र ीमपेक्षा आमच्या क्रीमने कसा जास्त गोरा रंग येतो याचे दावे सुरू झाले. एकीकडे ही क्रीम्स कोटय़वधी रुपयांचा धंदा करत असताना आणि जाहिरातीत दाखवतात तसा कोणाचाही रंग गोरा होत नसतानाही त्याबद्दल कोणी तक्रारसुद्धा करेना. कारण त्या जाहिरातीत दिसलेलं स्वप्न सगळ्यांना प्रत्यक्षात यायला पाहिजे होतं. माणूस एकवेळ इतर गोष्टी अॅडजस्ट करू शकतो; पण स्वप्न सोडून देणं त्याच्याने शक्य होत नाही. या स्वप्न विकण्याच्या जिवावर सौंदर्याच्या बाजारातला फेअरनेस क्रीम्सचा धंदा आणि पारंपरिक पुरुषी वर्चस्वाच्या जिवावर ‘गोरी आणि सुंदर मुलगी पाहिजे’ ही लग्नाच्या बाजारातली मागणी वर्षानुवर्ष चालूच राहिली.
‘सुंदर म्हणजे गोरी’ किंवा ‘देखणा म्हणजे गोरा’ या गैरसमजाने आजवर किती मनं दुखावली असतील, कितींच्या मनात असुरक्षितता पेरली असेल, कितींना न्यूनगंडाची देणगी दिली असेल, कितींचा आत्मविश्वास हिरावून घेतला असेल आणि कितींना स्वत:बद्दल कायमचं असमाधान दिलं असेल याची काही गणतीच नाही.
पण अमेरिकेतल्या त्या एका घटनेने ठिणगी पडली. जगभर या वर्णभेदाविरु द्ध अचानक आवाज उठायला लागला. त्याचाच एक भाग म्हणून दोन मोठय़ा कंपन्यांनी काही बदल जाहीर केले आहेत.
फेअर अॅण्ड लव्हली या फेअरनेस क्रीम विकणा:या भारतातील सगळ्यात मोठय़ा कंपनीने असं जाहीर केलं की इथून पुढे त्यांच्या उत्पादन आणि जाहिरातींमध्ये ‘फेअर’ हा शब्द असणार नाही.
आशियातील लग्न जुळवणारी मोठी वेबसाइट असणा:या शादी डॉट कॉमने त्यांच्या फॉर्ममधील ‘त्वचेचा रंग’ हा कंपलसरी असलेला रकाना काढून टाकला आहे.
या दोन्ही घटना म्हटलं तर किरकोळ आहेत आणि  म्हटलं तर एका मोठय़ा बदलाची ही सुरुवात असू शकते. पण बाजारपेठ ही फार तर सुरुवात करून देऊ शकते. जोवर आपण आपल्या मानसिकतेत बदल करत नाही तोवर कुठलाही बदल कायम टिकू शकत नाही. त्यामुळे बाजारपेठेचं पाऊल योग्य दिशेला पडलेलं आहे. ते त्याच दिशेला पुढे न्यायचं का रिव्हर्स टाकून पुन्हा मागे जायचं हा निर्णय आपण, समाजाने घ्यायचा आहे!
अर्थात तरुण मुलामुलींनीही त्याची जबाबदारी घ्यायलाच हवी.


(गौरी मुक्त पत्रकार आहे.)
 

Web Title: being black or fair, why we are obsessed with white skin tone?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.