आज रंगणार जगातील पहिली ‘होम मॅरेथॉन’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 05:22 AM2020-04-10T05:22:44+5:302020-04-10T05:22:56+5:30

धावपटू घरात धावणार ४२.१९५ कि.मी. अंतर

The world's first 'home marathon' to be held today | आज रंगणार जगातील पहिली ‘होम मॅरेथॉन’

आज रंगणार जगातील पहिली ‘होम मॅरेथॉन’

Next

दुबई : जगातील पहिल्या ‘होम मॅरेथॉन’चे शुक्रवारी दुबई येथे आयोजन केले जाणार आहे. या मॅरेथॉनमध्ये ६२ देशातील ७४९ धावपटू आपापल्या घरी ४२.१९५ कि.मी.चे अंतर धावून पूर्ण करणार आहेत. या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारा सर्वात तरुण सहभागी १८ वर्षांचा आहे, तर वयस्कर ६५ वर्षांचा आहे. मॅरेथॉन संयुक्त अरब अमिरात (यूएई)च्या वेळेनुसार सकाळी ८ वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान आयोजित केली जाईल.
अशा प्रकारे सहभागी धावपटू दहा तासाच्या आत मॅरेथॉनमध्ये सहभागी होतील. ‘होम मॅरेथॉन’मध्ये ४२.१९५ कि.मी. अंतर पूर्ण करावे लागणार असून ही मॅरेथॉन सर्वच वयोगटातील लोकांसाठी खुली आहे. यात या क्षेत्रातील अनेक धावपटू सहभागी होत आहेत.
त्यात यूएईशिवाय कुवैत, सौदी अरब, ओमान, बहरीन आणि जॉर्डनमधील धावपटू सहभागी होतील. या मॅरेथॉनचे आयोजन दुबई क्रीडा परिषद (डीएससी), ए.एस.आय. सी. एस. मिडल ईस्ट आणि ५:३० रन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने केले जात आहे. (वृत्तसंस्था)

कशी असणार मॅरेथॉन
च्स्पर्धक धावण्यासाठी आपली जागा स्वत: निश्चित करू शकतील.
च्ट्रेडमिल अथवा अन्य उपकरणाचा उपयोग करण्यास परवानगी असणार नाही. सार्वजनिक ठिकाणी धावण्याचीही परवानगी नाही.
च्सहभागी होणाऱ्या धावपटूंकडे पूर्णपणे चार्ज असलेले स्मार्टवॉच आणि स्मार्टफोन असावा व त्यात स्ट्रॅव्हा अ‍ॅप सुरू असावा.
च्स्ट्रॅव्हावर ‘मॅरेथॉन अ‍ॅट होम’ समूहाशी जोडले जावे लागेल व त्याच्याशी सातत्याने जोडलेले राहावे लागेल. हा ट्रॅक त्याची वेळ आणि अंतर पूर्ण करण्यास मदत करील.अव्वल असणाऱ्यांना पुरस्कार दिला जाणार आहे, तर शर्यत पूर्ण करणाºयांना प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे.

Web Title: The world's first 'home marathon' to be held today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.