महाराष्ट्र राज्य रोलर स्केटिंग स्पर्धा: वसईच्या स्मित वैद्यला दोन पदकं, सुवर्णसह जिंकले रौप्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 04:00 PM2021-10-10T16:00:51+5:302021-10-10T16:02:14+5:30

या संपूर्ण स्केटिंग स्पर्धेसाठी याठिकाणी पालघर ठाणे,रायगड आणि पुणे जिल्ह्यातील जवळपास विविध वयोगटातील ४०० हून अधिक विद्यार्थी स्पर्धक सहभागी झाले होते.

vasai smit vaidya wins gold silver medal in maharashtra state roller skating championship | महाराष्ट्र राज्य रोलर स्केटिंग स्पर्धा: वसईच्या स्मित वैद्यला दोन पदकं, सुवर्णसह जिंकले रौप्य 

महाराष्ट्र राज्य रोलर स्केटिंग स्पर्धा: वसईच्या स्मित वैद्यला दोन पदकं, सुवर्णसह जिंकले रौप्य 

Next

आशिष राणे, वसई 

खोपोली येथे झालेल्या रुरल गेम रोलर स्केटिंग महाराष्ट्र राज्य सिलेक्शन चॅम्पियनशिप -२०२१ स्पर्धेत १३ वर्ष वयोगटात वसई तालुक्यातील नाझरेथ कॉन्व्हेंट हायस्कुलच्या स्मित शशांक वैद्यनं ५०० मीटर व १००० मीटर रोलर स्केटिंगमध्ये अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले.  

या संपूर्ण स्केटिंग स्पर्धेसाठी याठिकाणी पालघर ठाणे,रायगड आणि पुणे जिल्ह्यातील जवळपास विविध वयोगटातील ४०० हून अधिक विद्यार्थी स्पर्धक सहभागी झाले होते. दरम्यान वसई तालुक्यातील डी एम स्पोर्ट्स मधील ३० स्पर्धक यात सहभागी झाले होते. त्यापैकी स्मितने दोन पदकं जिंकली. त्याचाच वयोगटातील मारियाने सुध्दा रौप्य व कांस्यपदक पटकावले. याशिवाय वसईतील ६ ते १३ वयोगटात असलेल्या स्पर्धकांनी एकूण ५ सुवर्ण, ३ रौप्य आणि १ कांस्यपदक जिंकून दिले.

यामध्ये ६ वर्षं गटात विवीयन, ७ वर्षे गटात कयान आणि मनस्वीने २०० व ४०० मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकून दिलं, तर ११वर्षे गटात ओरेनने ५०० व १००० मीटरमध्ये रोप्यपदक जिंकले. मात्र आमच्या मुलांना प्रशिक्षण देणारे हेच त्यांचे खरे शिक्षक व पाल्य आहेत किंबहुना स्मित वैद्य याच्या या कामगिरीचे कौतुक करताना स्मितचे वडील शशांक वैद्य यांनी डी एम स्पोर्ट्स चे प्रशिक्षक डिक्सन मार्टीन यांनाच श्रेय दिले असून त्यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले म्हणूनच मुलांनी हे यश संपादन केले असे लोकमत शी बोलताना सांगितले.
 

Web Title: vasai smit vaidya wins gold silver medal in maharashtra state roller skating championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app