युनायटेड फायटिंग चॅम्पियनशीपमधील महिलांच्या गटातील विश्वविजेत्या 31 वर्षीय अमांडा नन्सनं स्वतःच्या वाढदिवशी चाहत्यांना धक्का देणारी भेट दिली. तिनं रिंगमधील कामगिरीनं नव्हे, तर फोटोशूटमधून हा धक्का दिला आहे. नन्सनं शरीरावर एकही वस्त्र परिधान न करता हे फोटोशूट केलं आहे. शरीरावर केवळ तिनं जिंकलेली UFC वर्ल्ड चॅम्पियनशीपचे टायटल दिसत आहेत.

तिनं हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताच नेटिझन्स तो पाहण्यासाठी तुटून पडले. UFC मधील माजी दिग्गज पिअर्ल गोझालेज यानं, तुझा हा लूक आवडतो, अशी प्रतिक्रीया दिली. यापूर्वीही जुलै महिन्यात नन्सनं तिचा शॉवर पिक शेअर केला होता. 


अमांडा नन्स पुढील महिन्यात जर्मेन डी रँडमी हिच्याशी सामना करणार आहे. अमांडा आणि जर्मेन यांच्यातील जय-पराजयाची आकडेवारी 4-3 अशी आहे. सहा वर्षानंतर या दोघी एकमेकींसमोर येणार आहेत. त्यामुळे त्यांचा सामना पाहण्याची सर्वांना उत्सुक आहे. 


Web Title: UFC world champion Amanda Nunes wows fans by posing naked with only her belts
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.