टायसन १५ वर्षानंतर बॉक्सिंग रिंगणात परतणार; सरावादरम्यान ट्रेनरवर केला ठोशांचा प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 12:09 AM2020-05-03T00:09:03+5:302020-05-03T06:42:33+5:30

अलीकडे इन्स्टाग्राम ‘लाईव्ह चॅट’मध्ये बोलताना टायसनने मागच्या आठवड्यापासून आपण ‘ग्लोव्ह्ज’सह सराव करीत असल्याचे म्हटले होते.

Tyson to return to boxing after 15 years; Punch to the trainer during practice | टायसन १५ वर्षानंतर बॉक्सिंग रिंगणात परतणार; सरावादरम्यान ट्रेनरवर केला ठोशांचा प्रहार

टायसन १५ वर्षानंतर बॉक्सिंग रिंगणात परतणार; सरावादरम्यान ट्रेनरवर केला ठोशांचा प्रहार

Next

नवी दिल्ली : अमेरिकेचा दिग्गज मुष्टियोद्धा माईक टायसन १५ वर्षानंतर व्यावसायिक रिंगणात उतरणार आहे. एका चॅरिटी लढतीसाठी त्याने तयारी सुरू केली आहे. १९८० च्या दशकात या खेळावर वर्चस्व गाजविणाऱ्या ५३ वर्षांच्या माईक टायसनने २००५ ला अखेरची प्रतिस्पर्धी लढत खेळली. केविन मॅकब्राईडविरुद्ध खेळल्यानंतर २० वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीला त्याने पूर्णविराम दिला होता. ५० पैकी ४४ लढती जिंकणाºया टायसनला ‘आॅल टाइम ग्रेट बॉक्सर’ संबोधले जाते. शिवाय त्याला या ग्रहावरील सर्वांत ‘विक्षिप्त माणूस’ असेही संबोधले गेले आहे.

टायसन हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ याच्यासोबत एका चित्रपटात काम करणार आहे. त्यासाठी प्रमोशन सुरू झाले असून टायसनने जो व्हिडिओ शूट केला त्यात स्वत:ला सर्वांत वाईट मुलगा असे कॅप्शन लिहिले. ‘जगातील सर्वात वाईट मुलगा’ असे त्याने लिहिले असून ट्रेनरसोबत तो सराव करताना दिसत आहे. अवघ्या चार सेकंदात त्याने सहा पंच मारले. टायसनच्या पॉवरफुल पंचपुढे ट्रेनरचा टिकाव लागला नाही. ते ‘नॉकआऊट’ झाले.

अलीकडे इन्स्टाग्राम ‘लाईव्ह चॅट’मध्ये बोलताना टायसनने मागच्या आठवड्यापासून आपण ‘ग्लोव्ह्ज’सह सराव करीत असल्याचे म्हटले होते. माझे शरीर मोठे झाले असून पंच मारणे कठीण होत असल्याची कबुली दिली होती. शरीर पिळदार करण्यासाठी टायसनला जिममध्ये जायचे आहे. ज्यांच्याकडे स्वत:चे घर नाही, अशांना मदत करण्यासाठी तो पुन्हा रिंगणात उतरणार आहे. चार-पाच राऊंड लढत देण्यासाठी शरीरावर मेहनत घेण्याचा त्याचा निर्धार आहे. १९८४ ला वयाच्या २० व्या वर्षी ट्रॅव्हर बार्बरिक याचा विक्रम मोडित काढणाºया टायसनच्या नावावर ‘हेविवेट चॅम्पियन’ हा विक्रम कायम आहे. 

Web Title: Tyson to return to boxing after 15 years; Punch to the trainer during practice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.