Paralympics Avani Lekhara: लय भारी! ऐतिहासिक 'सुवर्ण'वेध घेणाऱ्या नेमबाज अवनी लेखराची 'कांस्य'कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 11:39 AM2021-09-03T11:39:19+5:302021-09-03T11:45:39+5:30

Paralympics Avani Lekhara: याआधी अवनी लेखरा हिची टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी पाहायला मिळली होती.

Tokyo Paralympics, R8 Women's 50m Rifle 3P SH1: Avani Lekhara wins bronze medal | Paralympics Avani Lekhara: लय भारी! ऐतिहासिक 'सुवर्ण'वेध घेणाऱ्या नेमबाज अवनी लेखराची 'कांस्य'कमाई

Paralympics Avani Lekhara: लय भारी! ऐतिहासिक 'सुवर्ण'वेध घेणाऱ्या नेमबाज अवनी लेखराची 'कांस्य'कमाई

Next

Tokyo Paralympics 2020 : टोकियो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics) भारताचा धमाका सुरुच आहे. अॅथलिट प्रवीण कुमारने (Praveen Kumar) उंच उडीत रौप्य पदक जिंकल्यानंतर भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर पडली आहे. टोकियो पॅरालिम्पिकमधील 50 मीटर राइफल थ्री पोजिशन स्पर्धेत भारताची नेमबाज अवनी लेखरा हिने कांस्यपदक पटकावले आहे. (Tokyo Paralympics, R8 Women's 50m Rifle 3P SH1: Avani Lekhara wins bronze medal)

याआधी अवनी लेखरा हिची टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी पाहायला मिळाली होती.  10 मीटर एअर रायफल स्पर्धेत अवनी लेखराला सुवर्ण पदक मिळाले  होते. दरम्यान, अवनी लेखराने क्वॉलिफिकेश राउंडमध्ये सातवे स्थान पटकावले होते. 

ऑलिम्पिक असो वा पॅरालिम्पिक या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी अवनी ही भारताची पहिली महिला खेळाडू आहे. तत्पूर्वी पी.व्ही. सिंधू आणि मीराबाई चानू यांनी ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या गटात रौप्यपदके जिंकली होती. तसेच पॅरालिम्पिकध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती भारताची चौथी खेळाडू आहे.

या स्पर्धेत मुरलीकांत पेटकर यांनी 1972 मध्ये भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले होते. त्यानंतर देवेंद्र झाझरियाने भारतासाठी दुसरे आणि तिसरे पदक जिंकले. तर चौथे पदक मरियप्पन थंगावेलू याने जिंकले होते.

प्रवीणकुमारने जिंकले रौप्यपदक
भारताचा अॅथलिट प्रवीण कुमारने (Praveen Kumar) देशासाठी आणखी एक रौप्य पदक जिंकले आहे. प्रवीण कुमारने पुरुषांच्या T44 उंच ऊडी स्पर्धेत हा पराक्रम केला. उंच उडीत भारताला मिळालेले हे तिसरे पदक आहे. यापूर्वी निषाद कुमार आणि मरियप्पन यांनी भारतासाठी रौप्य पदके जिंकली होती. प्रवीण कुमारने पुरुषांच्या उंच उडी टी 64 स्पर्धेत 2.07 मीटरची नोंद केली. हा आशियाई विक्रम ठरला आहे. ब्रिटनच्या जोनाथन ब्रूम-एडवर्ड्सने 2.10 मीटरसह सुवर्ण, तर पोलंडच्या मॅसिज लेपियाटोने 2.04 मीटरसह कांस्य पदक जिंकले.
 


 

Web Title: Tokyo Paralympics, R8 Women's 50m Rifle 3P SH1: Avani Lekhara wins bronze medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.