Tokyo Paralympics: भारताचा पॅरालिम्पिकमध्ये 'सुवर्ण' इतिहास! बॅडमिंटनपटू कृष्णा नागरनं जिंकलं 'गोल्ड'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 10:07 AM2021-09-05T10:07:49+5:302021-09-05T10:10:20+5:30

Tokyo Paralympics: टोकियो पॅरालिम्पिकच्या अखेरच्या दिवशी देखील भारतीय खेळाडूंकडून पदकांची लयलूट सुरू आहे.

Tokyo paralympics krishna nagar won gold medal for india in badminton | Tokyo Paralympics: भारताचा पॅरालिम्पिकमध्ये 'सुवर्ण' इतिहास! बॅडमिंटनपटू कृष्णा नागरनं जिंकलं 'गोल्ड'

Tokyo Paralympics: भारताचा पॅरालिम्पिकमध्ये 'सुवर्ण' इतिहास! बॅडमिंटनपटू कृष्णा नागरनं जिंकलं 'गोल्ड'

googlenewsNext

Tokyo Paralympics: टोकियो पॅरालिम्पिकच्या अखेरच्या दिवशी देखील भारतीय खेळाडूंकडून पदकांची लयलूट सुरू आहे. भारताला टोकियो पॅरालिम्पिकमध्ये आज दुसरं पदक मिळालं आहे. भारताच्या कृष्ण नागर यानं एसएच-६ प्रकारात चीनच्या के चू मैन कै याचा पराभव करत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. तिसऱ्या सेटपर्यंत रंगलेल्या या सामन्यात कृष्णा नागर यानं चीनी प्रतिस्पर्ध्यावर २१-१७, १६-२१,२१-१७ असा पराभव केला. (Tokyo paralympics krishna nagar won gold medal for india in badminton)

टोकियो पॅरालिम्पिकचा आजचा शेवटचा दिवस असून आजच्या दिवसाची सुरुवात भारतासाठी चांगली झाली आहे. दिवसाच्या सुरुवातीलाच भारतीय बॅडमिंटनपटू आणि गौतम बुद्ध नगरचे जिल्हाधिकारी सुहास एल यथिराज यांनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली. फ्रान्सच्या वर्ल्ड नंबर वन लुकास मजूर विरुद्धच्या ६३ मिनिटांच्या लढाईत १५-२१, २१-१७,२१-१५ असा पराभव झाला. 

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यातील पदकांची संख्या आता १९ वर पोहोचली आहे. कृष्णा नागर यानं भारताला पाचवं सुवर्ण पदक जिंकून दिलं आहे. शनिवारी प्रमोद भगत यानंही सुवर्ण पदकाची कमाई केली. त्याआधी मनीष नरवाल यानं ५० मीटर पिस्तल, अवनी लेखरा हिनं १० मीटर पिस्तल आणि सुमित अंतिल यानं भालाफेकीत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. भारताच्या खात्यात आता ५ सुवर्ण, ८ रौप्य आणि ६ कांस्य पदकांची कमाई झाली आहे. पॅरालिम्पिकमध्ये भारताची ही आजवरची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. याआधी रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारतानं २ सुवर्ण आणि ४ रौप्य पदकांची कमाई केली होती.

Web Title: Tokyo paralympics krishna nagar won gold medal for india in badminton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.