Tokyo Olympics: लवलीना ऐतिहासिक कामगिरीसाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 07:03 AM2021-08-04T07:03:46+5:302021-08-04T07:04:27+5:30

Lovlina Borgohain: भारतीय महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेन ही ६९ किलो गटात पहिल्या ऑलिम्पिक पदकासाठी आज बुधवारी तुर्कस्थानची सध्याची विश्वविजेती बुसेनाज सूरमेनेलीविरुद्ध  विजय नोंदविण्याच्या निर्धाराने रिंगणात उतरणार आहे.

Tokyo Olympics: Lovlina Borgohain ready for historic performance | Tokyo Olympics: लवलीना ऐतिहासिक कामगिरीसाठी सज्ज

Tokyo Olympics: लवलीना ऐतिहासिक कामगिरीसाठी सज्ज

Next

टोकियो : भारतीय महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेन ही ६९ किलो गटात पहिल्या ऑलिम्पिक पदकासाठी आज बुधवारी तुर्कस्थानची सध्याची विश्वविजेती बुसेनाज सूरमेनेलीविरुद्ध  विजय नोंदविण्याच्या निर्धाराने रिंगणात उतरणार आहे. लवलीनाने उपांत्यफेरीचा अडथळा पार केल्यास अंतिम फेरी गाठणारी ती पहिली भारतीय बॉक्सर ठरेल. विजेंदरसिंग याने २००८ला कांस्य आणि त्यानंतर एम. सी. मेरीकोमने २०१२ला या खेळात कांस्य जिंकले होते. लवलीनाचे पदक हे भारतीय बॉक्सरचे गेल्या नऊ वर्षांतील पहिलेच पदक असेल. 

तेजिंदर, अनुराणी, सोनम पराभूत
टोकियो: ऑलिम्पिकचा मंगळवारचा दिवस भारतासाठी फारच निराशादायी ठरला.  भारताचा पुरुष हॉकी संघ उपांत्य फेरीच्या सामन्यात बेल्यियमकडून पराभूत झाल्यानंतर मैदानी स्पर्धेच्या भालाफेकीत अनुराणी पात्रता फेरीत १४ व्या तर गोळाफेकपटू तेजिंदर पालसिंग तूर १३ व्या स्थानी राहिला. महिला कुस्तीत सोनम मलिक देखील पदार्पणाच्या पहिल्या लढतीत ६२ किलो फ्रीस्टाईल प्रकारात पराभवासह बाहेर पडली.
तेजिंदरने पहिल्या प्रयत्नात १९.९९ मीटर गोळा फेकला. त्याचा दुसरा आणि तिसरा प्रयत्न अपयशी ठरला. दोन्ही गटातील आघाडीचे १२ खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार असल्याने पदकाच्या शर्यतीतून बाद झाला.
भालाफेकपटू अनुराणी ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकली नाही. मंगळवारी ५४.०४ मीटर फेक करीत अनू अ गटात १४ व्या स्थानी राहिली.१४ खेळाडूंमध्ये अनूने ५०.३५ मीटरसह सुरुवात केली. दुसऱ्या प्रयत्नांत ५३.१९ मीटरचे अंतर गाठले. 

Web Title: Tokyo Olympics: Lovlina Borgohain ready for historic performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.