Tokyo olympics: ‘किक बॉक्सर’ ते बाॅक्सर, संयम हे लवलीनाचे वैशिष्ट्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 06:14 AM2021-07-31T06:14:55+5:302021-07-31T06:15:53+5:30

Tokyo olympics Live Updates: लवलीना टोकियोचे तिकीट मिळविणारी आसामची पहिली खेळाडू होती. मेरोकोम बाहेर पडल्यानंतर निराश झालेल्या भारतीय चाहत्यांना लवलीनाने स्वत:च्या कामगिरीद्वारे आनंद साजरा करण्याची संधी मिळवून दिली.

Tokyo olympics: From ‘kick boxer’ to boxer, restraint is the hallmark of Lovelina Borgohain | Tokyo olympics: ‘किक बॉक्सर’ ते बाॅक्सर, संयम हे लवलीनाचे वैशिष्ट्य

Tokyo olympics: ‘किक बॉक्सर’ ते बाॅक्सर, संयम हे लवलीनाचे वैशिष्ट्य

googlenewsNext

नवी दिल्ली : ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी दुसरे पदक निश्चित करणारी बॉक्सर लवलीना बोरगोहेन हिला या खेळाकडे वळविणारे साईचे कोच पदम बोरो यांनी कालच सांगितले होते, ‘की लवलीना सहज जिंकेल, टेेन्शन घेऊ नका’! लवलीना आधी किक बॉक्सर होती. तिला हौशी बॉक्सिंगकडे वळविण्याचे श्रय बोरो यांना जाते. आसामच्या या २३ वर्षाच्या मुलीने गोलाघाटबरो मुखिया गावातून खेळाचा प्रवास सुरू केला. जवळच काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्य आहे. मोठ्या बहिणी लीचा आणि लीमा या किकबॉक्सर आहेत. मर्यादित साधने असताना आईवडिलांनी तिन्ही मुलींच्या खेळातील आवडीनिवडी जोपासल्या. लवलीनाच्या स्वप्नपूर्तीसाठी आईवडिलांनी मुलीला बोरो यांच्याकडे सोपविले. चेहऱ्यावर हास्य ठेवणारी लवलीना टोकियोचे तिकीट मिळविणारी आसामची पहिली खेळाडू होती. मेरोकोम बाहेर पडल्यानंतर निराश झालेल्या भारतीय चाहत्यांना लवलीनाने स्वत:च्या कामगिरीद्वारे आनंद साजरा करण्याची संधी मिळवून दिली.
बोरो म्हणतात, ‘लवलीनाचा शांत स्वभाव हे तिचे वैशिष्ट्य आहे. ती सहजपणे पराभूत होणाऱ्यांपैकी नाही. टेन्शन कधीच घेत नाही शिवाय शिस्तप्रिय आहे. मागच्यावर्षी आईच्या किडनी प्रत्यारोपणासच्यावेळी काही दिवस जवळ होती. नंतर ५२ दिवस युरोपात सरावाला जाण्याआधी लवलीना कोरोनाबाधित झाली. याचा फटका आशियाई स्पर्धेत बसला. पहिल्याच फेरीत ती पराभूत झाली. एकदा एकाग्रता भंग झाल्यामुळे तिने ध्यानसाधना करण्याचा निर्णय घेतला. याच एकाग्रतेच्या बळावर शुक्रवारी लवलीनाने कारकिर्दीत सर्वांत मोठे बक्षीस मिळविले आहे.’
 

Web Title: Tokyo olympics: From ‘kick boxer’ to boxer, restraint is the hallmark of Lovelina Borgohain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.