Tokyo Olympics: भारतीय महिला बॉक्सर लवलिना बोर्गोहेनचा सॉलिड पंच; पदकापासून एक विजय दूर!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 03:06 PM2021-07-27T15:06:35+5:302021-07-27T15:06:56+5:30

Tokyo Olympics: महिला बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन हिनं पदकाच्या आशा पल्लवीत केल्या.

Tokyo Olympics: Indian boxer Lovlina Borgohain qualify for quarterfinals in women's Welterweight (64-69kg) categary  | Tokyo Olympics: भारतीय महिला बॉक्सर लवलिना बोर्गोहेनचा सॉलिड पंच; पदकापासून एक विजय दूर!

Tokyo Olympics: भारतीय महिला बॉक्सर लवलिना बोर्गोहेनचा सॉलिड पंच; पदकापासून एक विजय दूर!

Next

Tokyo Olympics: टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत मंगळवारी भारतीय नेमबाजांनी पुन्हा हिरमोड केला. सौरभ चौधरी आणि मनू भाकेर या युवा खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली, परंतु त्यांना प्रतिस्पर्धींच्या तोडीसतोड खेळ करता आला नाही. त्यामुळे अंतिम फेरीत त्यांना पदकाच्या शर्यतीतून बाद व्हावे लागले. दुसरीकडे मात्र पुरुष हॉकी संघानं 3-0 अशा फरकानं स्पेनला पराभूत करून दमदार कमबॅक केले. तेच महिला बॉक्सर लवलिना बोर्गोहेन हिनं पदकाच्या आशा पल्लवीत केल्या. तिनं जर्मनीची अऩुभवी बॉक्सर नॅडीने अॅपेत्झवर 3-2 असा रोमहर्षक विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आता पदकासाठी तिला फक्त एक विजय मिळवण्याची गरज आहे. ( Tokyo Olympics: Indian boxer Lovlina Borgohain beats Nadine Apetz of Germany in women's Welterweight (64-69kg) Round of 16 to qualify for quarterfinals)

जर्मन बॉक्सरविरुद्ध लवलिनानं आक्रमक सुरुवात केली, दोघींनी सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन घडवताना चाहत्यांची उत्सुकता ताणून ठेवली होती. दुसऱ्या राऊंडमध्ये जर्मनच्या बॉक्सरनं अनुभव पणाला लावला, परंतु लवलिनाच्या निर्धारासमोर तिचे काहीच चालले नाही. पहिल्या दोन राऊंडमध्ये भारतीय बॉक्सरनं बाजी मारली, परंतु तिसऱ्या राऊंडमध्ये जर्मनीच्या बॉक्सरनं अधिक आक्रमकतेनं खेळ केला. पण, लवलिनानं उपउपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवला.   

उपांत्यपूर्व फेरीत तिच्यासमोर चायनीज तैपेईच्या चेन नेन-चीनचे आव्हान आहे. जागतीक स्पर्धेतील माजी विजेत्या चेनसमोर लवलिनाला आणखी आक्रमकतेनं खेळ करावा लागेल. 2018मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत याच प्रतिस्पर्धीनं लव्हलिनाला पराभूत केले होते आणि त्याचा वचपा काढण्याची संधी भारतीय खेळाडूकडे आहे. लवलिनानं हा सामना जिंकल्यास ती उपांत्य फेरीत धडक देईल आणि कांस्यपदक निश्चित करेल. ( Lovlina Borgohain will take on former World Champion  Nien-Chin Chen in QF (69kg) on 30th Jul (0848 hrs IST). A win there would ensure a medal for her  In 2018 World Championships, Lovlina lost in Semis to the same boxer ) 

Web Title: Tokyo Olympics: Indian boxer Lovlina Borgohain qualify for quarterfinals in women's Welterweight (64-69kg) categary 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.