Tokyo Olympics: सिंधूची विजयी सुरुवात, सलामीच्या लढतीत इस्राइलच्या पोलिकारपोव्हाचा उडवला धुव्वा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 08:18 AM2021-07-25T08:18:55+5:302021-07-25T08:19:25+5:30

Tokyo Olympics 2021 LIVE Updates: पहिल्या फेरीतील लढतीत सिंधूने इस्राइलच्या केसेनिया पोलिकारपोव्हाचा २१-७, २१-१० असा सरळ गेममध्ये धुव्वा उडवत पुढच्या फेरीमध्ये आगेकूच केली.

Tokyo Olympics 2021 LIVE Updates: PV Sindhu wins opening match against Ksenia Polikarpova of Israel | Tokyo Olympics: सिंधूची विजयी सुरुवात, सलामीच्या लढतीत इस्राइलच्या पोलिकारपोव्हाचा उडवला धुव्वा

Tokyo Olympics: सिंधूची विजयी सुरुवात, सलामीच्या लढतीत इस्राइलच्या पोलिकारपोव्हाचा उडवला धुव्वा

Next

टोकियो - रियो ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेती भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने यंदाच्या ऑलिम्पिकमधील आपल्या अभियानाची दमदार सुरुवात केली आहे. (Tokyo Olympics 2021 LIVE Updates)आज सकाळी झालेल्या पहिल्या फेरीतील लढतीत सिंधूने इस्राइलच्या केसेनिया पोलिकारपोव्हाचा २१-७, २१-१० असा सरळ गेममध्ये धुव्वा उडवत पुढच्या फेरीमध्ये आगेकूच केली.(PV Sindhu wins opening match against Ksenia Polikarpova of Israel)

भारताची पी.व्ही. सिंधू आणि इस्राइलची केसेनिया पोलिकारपोव्हा यांच्यातील लढत कमालीची एकतर्फी झाली. सिंधूने या लढतीवर सुरुवातीपासून वर्चस्व राखले. पहिल्या गेममध्ये २१-७ अशी बाजी मारल्यानंतर सिंधूने दुसरा गेमही २१-१० असा आरामात जिंकला आणि अवघ्या २८ मिनिटांमध्ये सामना खिशात घातला. 

दरम्यान, ऑलिम्पिकमधील अन्य लढतींमध्ये भारताच्या रोईंग टीमने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अर्जुन लाल आणि अरविंद सिंह यांच्या टीमने रेपचेज रेसमधून उपांत्य फेरी गाठली आहे. 
मात्र भारताला सर्वाधिक अपेक्षा अलेल्या मनू भाकर हिला महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल गटात अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. पात्रता फेरीत मनू भाकर नवव्या, तर यशस्विनी डेसवाल ११ व्या स्थानावर राहिली. 

Web Title: Tokyo Olympics 2021 LIVE Updates: PV Sindhu wins opening match against Ksenia Polikarpova of Israel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.