Tokyo Olympic, Neeraj Chopra : चेन्नई सुपर किंग्सकडून नीरज चोप्राचा अनोखा गौरव, एक कोटींच्या बक्षीसांसह देणार भारी गिफ्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 10:53 PM2021-08-07T22:53:36+5:302021-08-07T22:55:42+5:30

Tokyo Olympic, Neeraj Chopra : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून ऐतिहासिक सुवर्णपदक नावावर केले.

Tokyo Olympic : Chennai Super Kings honours Gold medalist Neeraj Chopra, announces Rs 1 crore prize money, will be creating a special jersey  | Tokyo Olympic, Neeraj Chopra : चेन्नई सुपर किंग्सकडून नीरज चोप्राचा अनोखा गौरव, एक कोटींच्या बक्षीसांसह देणार भारी गिफ्ट!

Tokyo Olympic, Neeraj Chopra : चेन्नई सुपर किंग्सकडून नीरज चोप्राचा अनोखा गौरव, एक कोटींच्या बक्षीसांसह देणार भारी गिफ्ट!

Next

Tokyo Olympic, Neeraj Chopra : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून ऐतिहासिक सुवर्णपदक नावावर केले. अॅथलेटिक्समधील भारताचे हे १२५ वर्षांतील पहिलेच ऑलिम्पिक पदक ठरले. त्यानंतर नीरज चोप्रावर बक्षीसांचा वर्षाव सुरू झाला. हरयाणा सरकारनं ६ कोटी रुपयांचे, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी दोन कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा हे  नीरजला XUV 700 गिफ्ट करणार आहेत. बीसीसीआयनंही मोठी रक्कम जाहीर केली. त्यात चेन्नई सुपर किंग्सनंही नीरजसाठी मोठी घोषणा केली. 

शेतकऱ्याच्या पोरानं इतिहास घडवला; ऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा डौलानं फडकवला!

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंसाठी रोख बक्षीस रक्कमेची घोषणा केली. बीसीसीआय सुवर्णपदक विजेत्या नीरजला १ कोटी, रौप्यपदक विजेत्या मीराबाई व रवी दहिया यांना प्रत्येकी ५० लाख, कांस्यपदक विजेते पी व्ही सिंधू, लवलिना बोरगोईन आणि बजरंग पुनिया यांना प्रत्येकी २५ लाख व भारतीय पुरूष हॉकी संघाला १.२५ कोटी रुपये देणार आहे.  ( The BCCI announces prize money of 1cr for Indian Olympic Gold Medalist Neeraj Chopra.)  

चेन्नई सुपर किंग्सनंही नीरजला १ कोटी बक्षीस जाहीर केले अन् ते नीरजसाठी एक विशेष जर्सी तयार करणार आहेत आणि त्यावर ८७५८ हा क्रमांक असणार आहे. ( Chennai Super Kings honours Gold medalist Neeraj Chopra, announces Rs 1 crore prize money. CSK will be creating a special jersey with the number 8758 as a mark of respect to Neeraj Chopra. ) 

 

Web Title: Tokyo Olympic : Chennai Super Kings honours Gold medalist Neeraj Chopra, announces Rs 1 crore prize money, will be creating a special jersey 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.