'भारत-श्री'वर सुनीत जाधव आणि महाराष्ट्राचे वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 05:44 PM2019-04-01T17:44:24+5:302019-04-01T17:45:45+5:30

अनिल बिलावानेही इतिहास रचला

Suneet Jadhav won 'Mr. India' tittle and domination of Maharashtra in the competition | 'भारत-श्री'वर सुनीत जाधव आणि महाराष्ट्राचे वर्चस्व

'भारत-श्री'वर सुनीत जाधव आणि महाराष्ट्राचे वर्चस्व

Next

मुंबई : सुनीत जाधवला फक्त सुनीत जाधवच हरवू शकतो. हे सुनीत जाधवचं बोल खरे ठरले. काहींनी सुनीतला स्वताबद्दल अतिआत्मविश्वास असल्याचे टोमणे मारले होते. पण सुनीतने चेन्नईत झालेल्या 12 व्या राष्ट्रीय अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत आपणच सुल्तान असल्याचे दाखवून दिले. गतवर्षी राम निवासकडून पराभूत झालेल्या सुनीतने आपल्या पराभवाचा वचपा काढत चार वर्षांत तिसऱयांदा भारत श्री जिंकण्याची करामात केली.

इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनच्या मान्यतेने झालेल्या या स्पर्धेची चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सची झुंज सुरू होती. सारेच खेळाडू जबरदस्त दिसत होते. पण शेवटचे तीन गट म्हणजे काँटे की टक्कर.जेतेपदासाठी सुनीत जाधव, दिललचा नरेंदर यादव आणि सेनादलाच्या  अनुज कुमार तालियन यांच्यात कंपेरिझन करण्याचा निर्णय जजेसने घेतला आणि अन्य सात खेळाडूंचे आभार मानले.

तिन्ही खेळाडू ज्या विश्वासाने मंचावर आले, वाटत होते हे तिघेही विजेतेच आहेत. कंपेरिझन झाल्dयानंतर दुसऱया मिनीटाला जजेसनी नरेंदर आणि अनुजला पुन्हा कंपेरिझनला बोलवले तेव्हा अक्षरशा हृदयाचा ठोका चुकला.ही कंपेरिझन पहिल्dया स्थानासाठी होती, की दुसऱया आणि तिसऱया स्थानासाठी. सुनीतचे चाहतेही ही कंपेरिझन पाहून थोडेसे शांत झाले. सुनीतही शांत झाला. पण कंपेरिझननंतर जेव्हा नरेंदर यादवला तिसरा क्रमांक जाहीर केला तेव्हाच महाराष्ट्राच्या चाहत्यांनी  एकच जललेष केला. कारण झालेली कंपेरिझन दुसऱया आणि तिसऱया स्थानासाठी होती, हे तेव्हा स्पष्ट झालं. गेल्dयावेळी हुकलेलं जेतेपद सुनीत जाधवने पुन्हा खेचून आणलं. आशिया श्री आणि सहा वेळा महाराष्ट्र श्री जिंकणारा सुनीत तिसऱयांदा भारत श्री ठरला. हा एक विक्रमच म्हणावा लागेल.

अनिल बिलावानेही इतिहास रचला

सुनीत जाधवपाठोपाठ मुंबईकर अनिल बिलावानेही सर्वांचं लक्ष वेधलं. चार महिन्यांपूर्वी शरीरसौष्ठवाच्या मंचावर पदार्पण करणाऱया महाराष्ट्राच्या अनिल बिलावाने इतिहास रचला. त्याने आपल्या पहिल्याच स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकण्याचा पराक्रम केला. ही त्याची अवघी चौथीच स्पर्धा होती. तो सर्वप्रथम नवोदित मुंबई श्री मध्ये उतरला आणि जिंकला.मग त्याने मुंबई श्री जिंकण्याचा भीमपराक्रम केला आणि गेल्याच महिन्यात त्याने महाराष्ट्र श्री स्पर्धेत गटविजेतेपदासह सर्वोत्तम प्रगतीकारक खेळाडूचा मानही मिळविला होता.

महाराष्ट्र प्रथमच सांघिक विजेता

महाराष्ट्र सांघिक विजेता ठरणार हे सुनीत जाधवनेच भाकित केलं होतं. ते महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खरं करून दाखवलं. आजवर भारत श्रीवर नेहमीच रेल्वे आणि सेनादलाचे वर्चस्व असायचे, पण यावेळी 65 किलो वजनी गटात दिनेश कांबळे, 75 किलो वजनी गटात अनिल बिलावा आणि 90 किलो वजनी गटात सुनीतने बाजी मारल्dयामुळे महाराष्ट्राने संयुक्तपणे70 गुणांनिशी रेल्वेसह सांघिक विजेतेपदही पटकावले. महाराष्ट्राने प्रथमच सांघिक जेतेपद जिंकण्याची किमया साधली. विशेष म्हणजे रेल्वेच्या एकाही खेळाडूला गटविजेतेपदही पटकावता आले नाही तर सेनादलाचा अनुज कुमार हा एकमेव गटविजेता ठरला.

दिपाली ओगलेला रौप्य पदक

महिलांच्या मॉडेल फिजीक प्रकारात महाराष्ट्राची दिपाली ओगले रौप्य पदक विजेती ठरली. मिस महाराष्ट्र ठरलेल्dया मंजिरी भावसारला  चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. उत्तरप्रदेशची संजू मिस इंडिया ठरली. महिल्dयांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत मिस महाराष्ट्राचा मान मिळविणाऱया अमला ब्रम्हचारीलाही अपयश आले. ती चौथी आली. हरयाणाची गीता सैनी मिस इंडिया ठरली.

भारत श्री स्पर्धेचा निकाल

55 किलो वजनी गट - 1. नेता सिंग (मणिपूर),  2. अरूण चौधरी (गुजरात), 3. रॉनी कांता मैतेई (सेनादल), 4. श्रीकांता बाग (प. बंगाल), 5. सोनू (दिलल).

60 किलो वजनी गट -  1. दिपू दत्ता (आसाम), 2. नितीन म्हात्रे (महाराष्ट्र), 3. मनोज लखन (रेल्वे), 4. आरकेएम तोंबा (सेनादल), 5. आशिष मन (दिलल).

65 किलो वजनी गट -  1. दिनेश कांबळे (महाराष्ट्र), 2. शशी कुमार (राजस्थान), 3. एम.बी. सतीशकुमार (रेल्वे), 4. महीप कुमार (रेल्वे), 5. ए. निजामली (तामीळनाडू).

70 किलो वजनी गट - 1. अनिल गोचीकर (ओडिशा), 2. कोठनंदा रामन (रेल्वे), 3. विक्रम सिंग तोमर (दिलल), 4. विक्रम धामणकर (गोवा), 5. नागेंद्र (कर्नाटक).

75 किलो वजनी गट -  1. अनिल बिलावा (महाराष्ट्र), 2. दिनेश सिंग (मणिपूर), 3. भास्कर कांबळी (महाराष्ट्र), 4. मोहम्मद अन्सारी (उत्तर प्रदेश), 5. शिंगे योगराज (सेनादल).

80 किलो वजनी गट -  1. सागर कातुर्डे (आयकर), 2.jeEJeoj मलिक (हरयाणा), 3. समिरन नंदी (प. बंगाल), 4. श्रीजीत मोन (सेनादल), 5. अमित कुमार (हरयाणा).

85 किलो वजनी गट -  1. देवा सिंग (मणिपूर), 2. प्रीतम चौगुले (रेल्वे), 3. निलकांता घोष (प. बंगाल), 4. अजय (दिलल), 5. रामानिजनेयेलु (सेनादल).

90 किलो वजनी गट -  1. सुनीत जाधव (महाराष्ट्र), 2. रिजु जोस पॉल (केरळ), 3. तमीलनबान (सेनादल), 4. लवीन के (रेल्वे), 5. संतोष कुमार (केरळ).

100 किलो वजनी गट - 1. नरेंदर यादव (दिलल), 2. दयानंद सिंग (सेनादल), 3. राजेंद्रन मणी (तामिळनाडू), 4. महेंद्र पगडे (महाराष्ट्र), 5. सागर जाधव (रेल्वे).

100 किलोवरील गट - 1. अनुज कुमार तालियन (सेनादल), 2. जावेद अली खान (रेल्वे), 3. विनय कुमार (दिलल), 4. नितीन चंडिला (हरयाणा), 5. विवेक (कर्नाटक)

चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स - सुनीत जाधव (महाराष्ट्र)

उपविजेता - अनुज कुमार तालियन (सेनादल), द्वितीय उपविजेता - नरेंदर यादव ( दिलल).

बेस्ट पोझर - टी मैतेई (सेनादल), प्रगतीकारक खेळाडू - दिनेश सिंग (मणिपूर).

सांघिक विजेतेपद - महाराष्ट्र आणि रेल्वे (दोघेही 70 गुण). उपविजेता - सेनादल (65).

महिला शरीरसौष्ठव - 1. गीता सैनी (हरयाणा), 2. माधवी बिलोचन (झारखंड), 3. वंदना ठाकूर (मध्यप्रदेश), 4. अमला ब्रम्हचारी (महाराष्ट्र), 5. तन्वीर हक (महाराष्ट्र)

महिला मॉडेल फिजीक - 1. संजू दलाक (उत्तर प्रदेश), 2. दिपाली ओगले (महाराष्ट्र), 3. अंकिता सिंग (कर्नाटक), 4. मंजिरी भावसार (महाराष्ट्र), 5. निशा भोयर (छत्तीसगड).

Web Title: Suneet Jadhav won 'Mr. India' tittle and domination of Maharashtra in the competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.