Star Boxer Neeraj seriously injured in a serious accident | स्टार बॉक्सर नीरज गोयत अपघातामध्ये गंभीर जखमी
स्टार बॉक्सर नीरज गोयत अपघातामध्ये गंभीर जखमी

नवी दिल्ली : कार अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्यानंतर भारतीय व्यावसायिक बॉक्सर नीरज गोयत याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र यामुळे आता त्याला ब्रिटनचा स्टार बॉक्सर आमिर खानविरुद्ध पुढील महिन्यात होणाऱ्या डब्ल्यूबीसी पर्ल जागतिक अजिंक्यपद लढतीतून बाहेर पडावे लागले. हरियाणाचा असलेला नीरज सरावानंतर घरी परतत असताना त्याच्या कारला अपघात झाला.
१२ जुलैला नीरजचा सामना दोनवेळचा विश्वविजेत्या आमिर खानविरुद्ध सौदी अरब येथील जेद्दाह येथे होणार होता. सुपर बॉक्सिंग लीगचे प्रमोटर बिल दोसांज यांनी याविषयी सांगितल की, ‘आमिर खानविरुद्धच्या लढतीची तयारी करणारा भारताचा स्टार बॉक्सर नीरज गोयतच्या कारला अपघात झाल्याने त्याच्या चेहºयाला, डोक्याला आणि हाताला मार लागला आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून तो लवकर ठीक व्हावा यासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत.’
दरम्यान, आता स्पर्धा आयोजक नीरजच्या पर्यायाचा विचार करत आहेत. नीरज गोयत विद्यमान डब्ल्यूबीसी आशिया वेल्टरवेट विजेता आहे. त्याने आतापर्यंत आपल्या व्यावसायिक कारकिर्दीमध्ये दोन नॉकआऊटसह एकूण ११ विजय मिळवले आहेत. त्याचवेळी तीन लढतींमध्ये त्याला पराभवाचा सामनाही करावा लागलेला आहे, तर दोन लढती बरोबरीत सुटल्या आहेत. (वृत्तसंस्था)


Web Title:  Star Boxer Neeraj seriously injured in a serious accident
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.