Simona Halep beat Serena Williams and win Wimbledon's title | सेरेना विल्यम्सला नमवत सिमोना हालेपने पटकावले विम्बल्डनचे जेतेपद
सेरेना विल्यम्सला नमवत सिमोना हालेपने पटकावले विम्बल्डनचे जेतेपद

लंडन -  टेनिसच्या महिला एकेरीतील बलाढ्य म्हणून गणना होणाऱ्या सेरेना विल्यमला पराभवाचा धक्का देत सिमोना हालेप हिने यंदाच्या विम्बल्डनचे विजेतेपद पटवकावले. एकतर्फी झालेल्या लढतीत सिमोना हिने सेरेनावर 6-2, 6-2 अशी सरळ सेटमध्ये मात केली. हालेपचे हे विम्बल्डनमधील पहिलेच तर एकूण दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे.


महिला एकेरीतील सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेती खेळाडू बनण्यासाठी केवळ एका विजेतेपदाची आवश्यकता असलेल्या सेरेना विल्यम्सला आज धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागले. एकतर्फी झालेल्या लढतीत रोमानियाच्या सिमोना हालेप हिने पहिला सेट 6-2 अशा फरकाने जिंकत जोरदार सुरुवात केली. 
त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही चांगला खेळ करून लढतीत पुनरागमन करण्याचे सेरेना विल्यम्सचे प्रयत्न अयशस्वी ठरले. दुसऱ्या सेटमध्ये सिमोनाने पुन्हा एकदा 6-2 ने बाजी मारत सामना सरळ सेटमध्ये जिंकला.

Web Title: Simona Halep beat Serena Williams and win Wimbledon's title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.