Shocking! The shocking death of a boxer happened in the ring | Shocking! रिंगमध्येच झाला बॉक्सरचा धक्कादायक मृत्यू
Shocking! रिंगमध्येच झाला बॉक्सरचा धक्कादायक मृत्यू

मुंबई : एखाद्या खेळाडूचा मैदानात मृत्यू व्हावा, यासारखे दुर्देव नाही. यापूर्वी अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत. मैदानात चेंडू लागून काही खेळाडूंना आपला जीव गमवावा लागल्याचे पाहायला मिळाले आहे. आता तर एक धक्कादायक घटना बॉक्सिंगच्या रींगमध्ये पाहायला मिळाली आहे. रिंगमध्ये खेळत असताना एका बॉक्सरचा खाली कोसळून मृत्यू झाला आहे.

या बॉक्सरचे दैव एवढे वाईट होते की, तो आपल्या भावाच्या जागी रिंगमध्ये उतरला होता. त्याच्या भावाला दुखापत झाली होती.त्यामुळे त्याच्या कार्डवर हा खेळाडू रिंगमध्ये उतरला. सामना सुरु झाल्यावर दोघांमध्ये संयत लढत सुरु होती. पण त्यावेळी हा बॉक्सर खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे.

ही गोष्ट आहे बल्गेरियामधली. एका व्यावसायिक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये ही गोष्ट घडली. बोरिस वेलिचकोव्ह या बॉक्सरकडे व्यावसायिक बॉक्सिंग खेळण्याचे लायसन्स होते. पण दुखापतीमुळे त्याला या स्पर्धेला मुकावे लागले होते. त्याच्या लायसन्सवर भाऊ इस वेलिचकोव्ह हा या स्पर्धेत उतरला होता. या स्पर्धेतील एका सामन्यात त्याला मृत्यूला सामोरे जावे लागले.

या बॉक्सिंग स्पर्धेत इस वेलिचकोव्ह आणि आर्दित मुर्जा यांच्यामध्ये लढत होती. या सामन्याला सुरुवात झाल्यावर काही मिनिटांमध्येच इसचा मृत्यू झाल्याचे पाहायला मिळाले.


Web Title: Shocking! The shocking death of a boxer happened in the ring
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.