शिव थापा, पूजा राणी ‘सुवर्ण’साठी लढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 01:11 AM2019-10-31T01:11:11+5:302019-10-31T01:11:45+5:30

आॅलिम्पिक बॉक्सिंग चाचणी : आशिषची ६९ किलो गटातून चमक

Shiv Thapa, Pooja Rani will fight for 'Gold' in Tokyo boxing Test Event | शिव थापा, पूजा राणी ‘सुवर्ण’साठी लढणार

शिव थापा, पूजा राणी ‘सुवर्ण’साठी लढणार

Next

टोकियो : जागतिक स्पर्धेतील माजी कांस्य विजेता शिव थापा (६३ किलो) याने कडव्या झुंजीनंतर विजयासह बुधवारी आॅलिम्पिक चाचणी बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. दुसरीकडे, पूजा राणीने (७५ किलो) आणि आशिष (६९) यांनीही आपापल्या गटातून अंतिम फेरी गाठली. अन्य भारतीय खेळाडूंना मात्र सुरुवातीच्या फेरीत पराभवानंतर कांस्यवर समाधान मानावे लागले.

सकाळच्या सत्रात उपांत्य फेरीत चार वेळेचा आशियाई पदक विजेता तसेच या महिन्याच्या प्रारंभी तिसऱ्यांदा राष्टÑीय विजेता ठरलेल्या शिव थापा याने जपानचा दायसुके नारीमात्सु याच्यावर मात केली. शिव आणि पूजा यांनी कडव्या संघर्षानंतर विजय मिळविला. दोघांची कामगिरी शानदार ठरली. आशिषने जपानचा हिरोकी किज्यो याच्यावर विजय नोंदवून अंतिम फेरीत धडक दिली. आशियाई क्रीडा स्पर्धेची माजी कांस्य विजेती पूजा राणी हिने ब्राझीलची बिट्रिज सोरेस हिच्यावर सर्वसंमतीच्या निर्णयाआधारे मात केली. पूजाने आशियाई चॅम्पियनशिपचे रौप्य जिंकले होते. सिमरनजीत कौर (६०) व सुमित सांगवान (९१) यांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.


झरीन, पुइया यांची घोडदौड खंडीत
माजी विश्व ज्युनियर विजेती निकत झरीन ५१ किलो गटात तसेच पुरुष गटात वाहलीम पुइया (७५) उपांत्य लढतीत पराभूत होताच दोघांना कांस्यवर समाधान मानावे लागले. झरीन जपानची सना कावानोविरुद्ध, तर वाहलीम पुइया स्थानिक प्रबळ दावेदार युइतो मोरीवाकीविरुद्ध पराभूत झाले.

Web Title: Shiv Thapa, Pooja Rani will fight for 'Gold' in Tokyo boxing Test Event

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.