ऑलिम्पिक स्पर्धेवर तीव्र उन्हाळ्याचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 10:14 AM2019-07-27T10:14:20+5:302019-07-27T11:25:07+5:30

पुढच्या वर्षी म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धा 24 जुलै ते 9 ऑगस्टच्या दरम्यान टोकियोमध्ये होणार आहेत. परंतु जुलैमध्ये जपानमध्ये तीव्र उन्हाळा असणार असल्याचा अंदाज तेथील हवामान खात्याने वर्तविला आहे.

Severe summer crisis at the Olympics | ऑलिम्पिक स्पर्धेवर तीव्र उन्हाळ्याचे संकट

ऑलिम्पिक स्पर्धेवर तीव्र उन्हाळ्याचे संकट

Next

टोकियो -  पुढच्या वर्षी म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धा 24 जुलै ते 9 ऑगस्टच्या दरम्यान टोकियोमध्ये होणार आहेत. परंतु जुलैमध्ये जपानमध्ये तीव्र उन्हाळा असणार असल्याचा अंदाज तेथील हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे खेळाडूंसह प्रेक्षकांना देखील ह्याचा त्रास होणार आहे.  

उन्हाचा नाहक त्रास केवळ भारतातच नाही तर जगाच्या अनेक देशांमध्ये सहन करावा लागतो. फ्रान्सच्या राजधानी पॅरिससह युरोपचे बरेच शहराचे तापमान 40 अंशावर गेले आहेत. जपानच्या टोकियो शहराचे चित्र देखील असेच आहे.  

ऑलिम्पिक स्पर्धा 2020 मध्ये 24 जुलै ते 9 ऑगस्टच्या दरम्यान जपानची राजधानी अलणाऱ्या टोक्यो शहरात होणार आहेत. परंतु जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाचे तापमान असणार असल्याचे तेथील हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे खेळाडूंसह प्रेक्षकांना देखील ह्याचा त्रास होणार आहे.  

गेल्या वर्षी (2018) जुलैमध्ये उन्हाळ्यामुळे सर्वात जास्त मृत्यूची नोंद झाली. कारण उष्णतेमुळे आणि हवामानाशी संबंधित कारणामुळे 300 पेक्षा जास्त लोक मरण पावले होते. तर उष्णतेमुळे 54 हजाराहून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, ज्यात टोक्यो शहरातील 4430 लोकांचा समावेश होता. 

वाढत्या उन्हामुळे धावपटूंना ट्रॅकवर धावणे अत्यंत अवघड असल्याने याचा त्रास खेळाडूंना होऊ शकतो. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांनी आयोजकांना याबाबत कल्पना देखील दिली आहे. तसेच ऑलिम्पिक मधील मॅरेथॅान सारख्या स्पर्धा जुलै- ऑगस्टच्या ऐवजी एप्रिल महिन्यात सकाळी लवकर घ्यावी असे सुचविले आहे. 

या कार्यक्रमाला अद्याप 1 वर्षाचा कालावधी शिल्लक आहे, परंतु वातावरण थंड कसे ठेवले जाईल याची उपाययोजना 150 स्वयंसेवकांची नेमणुक करुन सुरु केली आहे. उन्हाळ्यात स्टेडियम किंवा कार्यक्रमाच्या जवळ एसी, पंखे आणि पाण्याचे कारंजे बसविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे कोल्ड शॉवर, ओपन-एअर बाऊट्ससाठी विनामूल्य बर्फाचे तुकडे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली जात आहे.  

Web Title: Severe summer crisis at the Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Japanजपान