बॅडमिंटन : रित्विक संजीवीला बांगलादेश इंटरनॅशनल चॅलेंज २०२१ स्पर्धेत उपविजेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 11:38 AM2021-12-08T11:38:57+5:302021-12-08T11:39:51+5:30

बांगलादेश इंटरनॅशनल चॅलेंज २०२१ मध्ये भारतीय बॅडमिंटनपटू रित्विक संजीवीने उपविजेतेपद पटकावले

Rithvik Sanjeevi from Hatsun Badminton Centre finishes runner up in Bangladesh International Challenge 2021 | बॅडमिंटन : रित्विक संजीवीला बांगलादेश इंटरनॅशनल चॅलेंज २०२१ स्पर्धेत उपविजेतेपद

बॅडमिंटन : रित्विक संजीवीला बांगलादेश इंटरनॅशनल चॅलेंज २०२१ स्पर्धेत उपविजेतेपद

googlenewsNext

बांगलादेशच्या ढाका येथील बंगबंधू नॅशनल स्टेडियममध्ये आयोजित बांगलादेश इंटरनॅशनल चॅलेंज २०२१ मध्ये भारतीय बॅडमिंटनपटू रित्विक संजीवीने उपविजेतेपद पटकावले. रविवारी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत अभिषेक सैनीशी २१-१५, २१-१८ अशी कडवी झुंज दिल्यानंतर रित्विक संजीवीला पराभव पत्करावा लागला. संजीवपाठोपाठ हॅटसन बॅडमिंटन केंद्रातील निला वल्लुवनने नझीर खान बरोबर मिश्र दुहेरी स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली.

बांगलादेश बॅडमिंटन फेडरेशनने आयोजित केलेल्या या ५ दिवसीय स्पर्धेचा समारोप झाला. जगभरातील खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला. भारतीय खेळाडूंनी यात उत्तम कामगीरी नोंदवली. या प्रसंगी बोलताना हॅटसन बॅडमिंटन केंद्राचे मुख्य मार्गदर्शक अजित हरिदास म्हणाले, "रित्विकचा प्रवास हा प्रशिक्षक  आणि त्यांच्या प्रशिक्षण पद्धत यांच्या सततच्या परिश्रमाचा मिलाफ आहे.नवीन उंची गाठण्याची क्षमता असलेल्या अशा खेळाडूबरोबर  काम करणे आनंददायी आहे. पुढच्या काळातही आम्ही विविध प्रतिभावंताची ओळख करून देत राहू.   

Web Title: Rithvik Sanjeevi from Hatsun Badminton Centre finishes runner up in Bangladesh International Challenge 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.