प्रो कबड्डी : तेलगु टायटन्सवर मात करत यू मुंबाची विजयी सलामी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 08:53 PM2019-07-20T20:53:02+5:302019-07-20T20:53:29+5:30

पहिल्या सत्रात टायटन्सच्या संघाने धडाकेबाज कामगिरी करत यू मुंबावर १७-१० अशी आघाडी घेतली होती.

Pro Kabaddi: Yu Mumba's winning salute defeating Telugu Titans | प्रो कबड्डी : तेलगु टायटन्सवर मात करत यू मुंबाची विजयी सलामी

प्रो कबड्डी : तेलगु टायटन्सवर मात करत यू मुंबाची विजयी सलामी

googlenewsNext

हैदराबाद : प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामाची दमदार सुरुवात यू मुंबाने केली. पहिल्याच सामन्यात  यू मुंबाने तेलुगू टायटन्सवर ३१-२५ असा पराभव करत विजयी सलामी दिली.



 

पहिल्या सत्रात टायटन्सच्या संघाने धडाकेबाज कामगिरी करत यू मुंबावर १७-१० अशी आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या सत्रात मात्र त्यांच्या हातून सामना निसटला.  यू मुंबा आणि टायटन्स या दोघांनीही बचावामध्ये प्रत्येकी दहा गुण कमावले. पण चढाईमध्ये मात्र  यू मुंबाचा संघ एका गुणाने वरचढ ठरला. टायटन्सने चढाईमध्ये १५ आणि  यू मुंबाने १६ गुणांची कमाई केली. पण  यू मुंबाने टायटन्सवर लोण चढवत चार गुणांची कमाई केली आणि बोनसचा एक गुण मिळवत त्यांनी बाजी मारली.

Web Title: Pro Kabaddi: Yu Mumba's winning salute defeating Telugu Titans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.