Pro Kabaddi League 2018 : दिल्लीची पुणेरी पलटणवर 'दबंग'गिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 10:17 PM2018-10-12T22:17:29+5:302018-10-12T22:36:47+5:30

Pro Kabaddi League 2018 :  चुरशीच्या लढतीत दिल्ली दबंगने प्रो कबड्डी लीगमध्ये पुणेरी पलटणवर 41-37 असा विजय मिळवला. 

Pro Kabaddi League 2018: Dabang delhi won against Puneri paltans | Pro Kabaddi League 2018 : दिल्लीची पुणेरी पलटणवर 'दबंग'गिरी

Pro Kabaddi League 2018 : दिल्लीची पुणेरी पलटणवर 'दबंग'गिरी

Next

चेन्नई : चुरशीच्या लढतीत दिल्ली दबंगने प्रो कबड्डी लीगमध्ये पुणेरी पलटणवर 41-37 असा विजय मिळवला.



पुण्याने सातत्यपूर्ण कामगिरी कायम राखताना दिल्ली संघाला कडवी टक्कर दिली. नितीन तोमरने पहिल्या सत्रातील अखेरच्या काही मिनिटांत सुरेख खेळ करताना दिल्लीवर लोण चढवत आघाडी घेतली. पहिल्या 10 मिनिटांत दिल्लीकडे 13-9 अशी आघाडी होती. मात्र, तोमरने एका चढाईत चार गुण घेत सामन्याला कलाटणी दिली. पहिल्या सत्रातील अखेरच्या चढाईत दोन गडी बाद करताना पुण्याला 22-20 अशी आघाडी मिळवून दिली. तोमरने 14 चढायांत 14 गुणाची कमाई केली. त्याच्या 11 चढाया यशस्वी ठरल्या. 


मध्यंतरानंतर दोन्ही संघांकडून जबरदस्त खेळ केला. दोघांकडून तोडीस तोड खेळ झाला. दुसऱ्या सत्रातील पहिल्या दहा मिनिटांत सामना 28-27 असा दिल्लीच्या बाजूने होता. पुण्याने लोण चढवत दिल्लीवर 33-29 अशी आघाडी घेतली. पण, दिल्ली हार मानण्यास तयार नव्हते. त्यांनी चतुराईने खेळ करताना अखेरच्या तीन मिनिटांपर्यंत पाच गुणांची आघाडी घेतली. हे चित्र पाहून पुण्याच्या खेळाडूंच चिंता वाढली होती. शेवटच्या तीन मिनिटांत ही आघाडी 8 ने वाढवत दिल्लीने विजय जवळपास पक्का केला होता. 



 

Web Title: Pro Kabaddi League 2018: Dabang delhi won against Puneri paltans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.