PKL 2019 : प्रो कबड्डीचा विजेता होणार मालामाल; खेळाडूंवरही वर्षाव! कोणाला किती मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 03:30 PM2019-07-19T15:30:04+5:302019-07-19T15:30:46+5:30

PKL 2019 : प्रो कबड्डी लीगच्या सातव्या मोसमाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे आणि त्याचा अंतिम सामना 19 ऑक्टोबरला होणार आहे.

PKL 2019 : know how much the winning team will get Prize Money | PKL 2019 : प्रो कबड्डीचा विजेता होणार मालामाल; खेळाडूंवरही वर्षाव! कोणाला किती मिळणार?

PKL 2019 : प्रो कबड्डीचा विजेता होणार मालामाल; खेळाडूंवरही वर्षाव! कोणाला किती मिळणार?

Next

मुंबई, प्रो कबड्डी लीग 2019 : प्रो कबड्डी लीगच्या सातव्या मोसमाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे आणि त्याचा अंतिम सामना 19 ऑक्टोबरला होणार आहे. प्रो कबड्डीच्या इतिहासात पाटणा पायरेट्स हा सर्वात यशस्वी संघ आहे आणि त्यांनी तीनवेळा जेतेपदाचा चषक उंचावला आहे. त्यांच्याशिवाय जयपूर पिंक पँथर्स, यू मुंबा आणि बंगळुरू बुल्स यांनी प्रत्येकी एक जेतेपद जिंकली आहेत. तेलुगू टायटन्स आणि यू मुंबा यांच्यात 20 जुलैला सलामीचा सामना हैदराबाद येथे होणार आहे. पहिल्याच दिवशी सध्याच विजेता बंगळुरू बुल्स आणि तीन वेळेचा विजेता पाटणा पायरेट्स यांच्यात दुसरा सामना खेळवण्यात येणार आहे.



यंदाची लीग ही साखळी फेरीत खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघ एकमेकांशी दोनवेळा खेळेल आणि अव्वल सहा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरणार आहेत. प्रत्येक शहरात शनिवारी लीग लढतींना सुरुवात होईल, तर मंगळवार हा विश्रांतीचा दिवस असणार आहे. घरच्या मैदानावर खेळण्यापूर्वी संघाला चार दिवसांची विश्रांती मिळणार आहे. प्रो कबड्डीमध्ये यंदा एकूण 8 कोटी रुपयांच्या बक्षीसांचं वाटप होणार आहे. प्रो कबड्डीच्या विजेत्या संघाला 3 कोटी रुपये दिले जाणार आहेत, तर उपविजेता 1.80 कोटी घेऊन जाईल. याशिवाय लीगमधील सर्वोत्तम खेळाडूला 15 लाख आणि सर्वोत्तम चढाईपटू व बचावपटूला प्रत्येकी 10-10 लाख दिले जाणार आहेत.




 

संघाला मिळणारी बक्षीस रक्कम...
विजेता        3 कोटी
उपविजेता        1.80 कोटी
तिसरा क्रमांक    1.20 कोटी
चौथा क्रमांक    80 लाख
5/6 क्रमांक    प्रत्येकी 35 लाख
 
वैयक्तिक पुरस्कार
मोस्ट व्हॅल्यूएबल खेळाडू    15 लाख
सर्वोत्तम चढाईपटू        10 लाख
सर्वोत्तम बचावपटू        10 लाख
सर्वोत्तम पदार्पणवीर        8 लाख
सर्वोतम पंच पुरुष        3.5 लाख
सर्वोतम पंच महिला        3.5 लाख



 

सहभागी 12 संघ
पुणेरी पलटन, जयपूर पिंक पँथर्स, दबंग दिल्ली, बंगाल वॉरियर्स, बंगळुरु बुल्स, गुजरात फॉर्च्युनजायंट्स, हरयाणा स्टिलर्स, पाटणा पायरेट्स, तमीळ थलायव्हाज, यू मुंबा, यूपी योद्धा, तेलुगु टायटन्स

Web Title: PKL 2019 : know how much the winning team will get Prize Money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.