मूर्ती लहान पण कीर्ती महान: ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा तिरंगा डौलानं फडकावणारे के वाय वेंकटेश!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 04:13 PM2021-11-10T16:13:50+5:302021-11-10T16:14:42+5:30

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मंगळवारी पद्म पुरस्कारांचे वितरण झालं. यावेळी पॅरा अ‍ॅथलिट के वाय वेंकटेश यांनाही पद्म श्री पुरस्कारानं गौरविण्यात आलं.

Padma Shri KY Venkatesh: Meet the para-athlete who did India proud at the world stage | मूर्ती लहान पण कीर्ती महान: ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा तिरंगा डौलानं फडकावणारे के वाय वेंकटेश!

मूर्ती लहान पण कीर्ती महान: ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा तिरंगा डौलानं फडकावणारे के वाय वेंकटेश!

googlenewsNext

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मंगळवारी पद्म पुरस्कारांचे वितरण झालं. यावेळी पॅरा अ‍ॅथलिट के वाय वेंकटेश यांनाही पद्म श्री  पुरस्कारानं गौरविण्यात आलं. क्रीडा क्षेत्रातील भरीव योगदानासाठी वेंकटेश यांचा हा सन्मान करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्यात वेंकटेश हे ज्यावेळी पुरस्कार स्वीकारण्यासाठी आले तेव्हा एक प्रसंग घडला. वेंकटेश हे राष्ट्रपती कोविंद यांच्या दिशेनं चालत आले आणि पायऱ्या चढू लागले, परंतु वेंकटेश व आपल्यातील अंतर फार असल्याचे राष्ट्रपतींना समजले आणि त्यांनी वेंकटेश यांना पायऱ्यांवरून खाली उतरण्यास सांगितले अन् स्वतःही खाली उतरले. त्यावेळी राष्ट्रपती भवनमध्ये उपस्थित सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.  


कोण आहेत हे के वाय वेंकटेश?
२००९साली झालेल्या पाचव्या  Dwarf Olympic ( ठेंगण्यांची ऑलिम्पिक स्पर्धा) भारतीय संघाचे नेतृत्व वेंकटेश यांनी केलं होतं. त्या स्पर्धेत भारतानं १७ पदकं जिंकली होती. ४४ वर्षीय वेंकटेश हे बंगलोरचे आणि त्यांची उंची ४ फुट व २ इंच एवढीच. पण, त्यांची कीर्ती ही महान आहे. वेंकटेश यांना achondroplasia हा अस्थीची वाढ खुंटून बुटकेपणा येणारा आजार आहे. लहानपणापासूनच ते असे आहेत, परंतु त्यांची खेळाप्रती प्रचंड आवड आहे. २००५च्या World Dwarf Games स्पर्धेत वेंकटेश यांनी सहा पदकं जिंकून  Limca Book of Recordsमध्ये जागतिक स्पर्धेत सर्वाधिक पदकं जिंकण्याच्या विक्रमाची नोंद केली आहे. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारे ते पहिले खेळाडू होते आणि त्यांनी अ‍ॅथलेटिक्स व बॅडमिंटन क्रीडा प्रकारात ही पदकं जिंकली. पॅरालिम्पिक प्रमाणे चार वर्षांतून एकदा World Dwarf Games स्पर्धा होते.

१९९४ साली त्यांनी कारकीर्दिला सुरुवात केली आणि जर्मनीत झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक कमिटी  अ‍ॅथलेटिक्स जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग घेतला. आता ते निवृत्त झाले असून कर्नाटक पॅरा-बॅडमिंटन संघटनेचे सचिव आहेत.   
 

Web Title: Padma Shri KY Venkatesh: Meet the para-athlete who did India proud at the world stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.