ऑलिम्पिकची संधी मिळाल्यास अवश्य भाग घेईन - विजेंदर सिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 11:24 PM2019-07-18T23:24:21+5:302019-07-18T23:25:06+5:30

माजी डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक चॅम्पियन विजेंदरने नेवार्क येथे अमेरिकन व्यावसायिक सर्किटमधील पदार्पणात आपल्याहून अधिक अनुभवी असलेल्या माईक स्नायडरचा तांत्रिक नॉकआऊटने पराभव केला.

Obviously, if we get an Olympic chance will take part - Vijender singh | ऑलिम्पिकची संधी मिळाल्यास अवश्य भाग घेईन - विजेंदर सिंग

ऑलिम्पिकची संधी मिळाल्यास अवश्य भाग घेईन - विजेंदर सिंग

Next

नवी दिल्ली: स्टार बॉक्सर विजेंदरसिंग याची व्यावसायिक सर्किटमधील वाटचाल यशस्वी ठरली असून दीड वर्षानंतर रिंगणात आलेल्या विजेंदरने सलग ११ वी लढत जिंकली. या यशामुळे ऑलिम्पिककडे वळण्याचा सध्यातरी त्याचा विचार नाही. तथापि, ‘मिडलवेटमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्यास अवश्य विचार करेन,’ असे तो म्हणाला.
माजी डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक चॅम्पियन विजेंदरने नेवार्क येथे अमेरिकन व्यावसायिक सर्किटमधील पदार्पणात आपल्याहून अधिक अनुभवी असलेल्या माईक स्नायडरचा तांत्रिक नॉकआऊटने पराभव केला. विजेंदरचा हा आठवा नॉकआऊट विजय होता.
चित्रपट, राजकारण आणि टीव्ही शोचा अँकर या गोष्टींमध्ये हात आजमावणाऱ्या विजेंदरने आपण कुठल्याही क्षेत्रात गेलो तरी बॉक्सिंग कधीही सुटणार नाही, असे स्पष्ट केले. ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याबाबत तो म्हणाला, ‘माझ्या प्रायोजकांसोबतच्या दोन लढती अद्याप शिल्लक आहेत. माझे लक्ष सध्यातरी या लढतींवर केंद्रित आहे. ऑलिम्पिकदरम्यान परिस्थिती कशी असेल याबाबत आताच काही सांगू शकत नाही. पण पुन्हा संधी मिळाली तर ऑलिम्पिकमध्ये नक्की जाईन.’
‘अमेरिकेतील पदार्पणात प्रतिस्पर्धी स्रायडरबाबत मला अधिक माहिती नव्हती. स्रायडरने पहिला ठोसा हाणला तेव्हा मी अवाक् झालो. ताबडतोब सावरून पुढील चार फेऱ्यांमध्ये त्याला नॉकआऊट केले,’ असेही विजेंदरने सांगितले.

Web Title: Obviously, if we get an Olympic chance will take part - Vijender singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.