New Zealand Open badminton: Prannoy clash in quarter-finals | न्यूझीलंड ओपन बॅडमिंटन: प्रणॉयची उपांत्यपूर्व फेरीत धडक
न्यूझीलंड ओपन बॅडमिंटन: प्रणॉयची उपांत्यपूर्व फेरीत धडक

ऑकलंड : भारताचा एच. एस. प्रणॉय याने टॉम सुगियार्तो याच्यावर सरळ गेममध्ये विजय नोंदवून गुरुवारी न्यूझीलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याचवेळी अन्य सामन्यात बी. साईप्रणीत मात्र महान खेळाडू लिन डॅन याच्याकडून पराभूत होताच स्पर्धेबाहेर पडला.

बिगर मानांकित प्रणॉयने दुसरा मानांकित सुगियार्तोला ३७ मिनिटांत २१-१४, २१-१२ ने पराभूत केले. प्रणॉयची गाठ आता जपानचा पाचवा मानांकित केंता सुनेयामाविरुद्ध पडेल. जागतिक क्रमवारीत २६ व्या स्थानी असलेला प्रणॉयचा १३ व्या स्थानावरील सुगयार्तोविरुद्ध हा पहिलाच सामना होता.

त्याआधी झालेल्या सामन्यात बी. साई प्रणीतला १२-२१, १२-२१ ने पराभवाचे तोंड पहावे लागले. बुधवारी सायना नेहवाल महिला एकेरीच्या पहिल्या सामन्यात २१२ व्या स्थानावरील चीनची खेळाडू वँग झियो हिच्याकडून दुर्दैवीरीत्या पराभूत होऊन बाहेर पडली. लिन डॅन याने विजयासह उपांत्यपूर्व फेरीत स्थान पटकविले त्याची गाठ आता इंडोनेशियाचा अव्वल मानांकित अ‍ॅन्थोनी सिनिसुका याच्याविरुद्ध पडेल. 


Web Title: New Zealand Open badminton: Prannoy clash in quarter-finals
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.