Maharashtra's easy victory in 66th Men's National Kabaddi Tournament | 66 व्या पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा सहज विजय
66 व्या पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा सहज विजय

रायगड : भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सौजन्याने 66व्या वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाली. यजमान महाराष्ट्र विरुद्ध विदर्भ यासामन्याने स्पर्धेला सुरुवात झाली.

महाराष्ट्र संघाने जोरदार सुरुवात करत सुरुवातीलाच विदर्भ संघावर लोन टाकत 10-0 अशी सुरुवात केली. त्यानंतर ही विदर्भ संघने काहीच प्रतिकार केली नाही. मध्यंतरापर्यत महाराष्ट्र संघाकडे 40-03 अशी भक्कम आघाडी होती. महाराष्ट्र कडून चढाईत तुषार पाटील, अजिंक्य पवार यांनी चांगला खेळ करत महाराष्ट्र संघाला आघाडी मिळवून दिली. तसेच गिरीश इरणक, अमीर धुमाळ व विकास काळे यांनी पकडीमध्ये जबरदस्त खेळ करत महाराष्ट्र संघाला 64-13 विजयी सलामी मिळवून दिली.

दुसऱ्या सामन्यात सेनादल संघाने मणिपूरचा 67-5 असा पराभव करत विजयी सलामी दिली. हरियाणाने छत्तीसगडचा 67-24 असा धुव्वा उडवला. कर्नाटक विरुद्ध बीएसनेल यांच्यात चांगली लढत झाली. कर्नाटकाने 57-45 असा विजय मिळवला.

English summary :
The 66th Senior Men's National Kabbadi Championship tournament started with the approval of the Indian Kabaddi Federation and the Maharashtra State Kabaddi Association organized by Raigad District Kabaddi Association. The tournament between Maharashtra vs Vidarbha. At the end, Maharashtra had a victory in 66th Men's National Kabaddi Tournament.


Web Title: Maharashtra's easy victory in 66th Men's National Kabaddi Tournament
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.