कबड्डी : अमर भारत, गोलफादेवी सेवा चौथ्या फेरीत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 05:57 PM2019-12-12T17:57:45+5:302019-12-12T17:59:03+5:30

अमर भारत क्रीडा मंडळाने मनोहर क्रीडा मंडळाचा ४०-१७ असा धुव्वा उडविला.

Kabaddi: Amar Bharat, Golfadevi mandal entered in fourth round | कबड्डी : अमर भारत, गोलफादेवी सेवा चौथ्या फेरीत दाखल

कबड्डी : अमर भारत, गोलफादेवी सेवा चौथ्या फेरीत दाखल

Next
ठळक मुद्देगोलफादेवीने गुड मॉर्निंगला ३८-१९ असे नमवित आरामात चौथी फेरी गाठली.

मुंबई मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ पुरस्कृत आणि मुंबई शहर कबड्डी असो. आयोजित “जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी” स्पर्धेच्या प्रथम श्रेणी स्थानिक गटात एकता संघ, अमर भारत, गोलफादेवी सेवा, एस.एस.जी. फौंडेशन यांनी चौथ्या फेरीत धडक दिली. नायगाव-मुंबई येथील भारतीय क्रीडा मंदिराच्या क्रीडांगणावर सुरू असलेल्या तिसऱ्या फेरीच्या सामन्यात एकता संघाने श्री गणेश स्पोर्ट्सला चुरशीच्या लढतीत ३४-२७ असे नमवित चौथी फेरी गाठली. मध्यांतराला १३-१४ अशा पिछाडीवर पडलेल्या एकताने मध्यांतरानंतर टॉप गिअर टाकत हा विजय साकारला. अरुण सावंत, शुभम पाटील या विजयाचे शिल्पकार ठरले. श्री गणेश क्लबच्या प्रणय भुरे, निखिल सातावकर यांचा खेळ मध्यांतरानंतर बहरला नाही.

अमर भारत क्रीडा मंडळाने मनोहर क्रीडा मंडळाचा ४०-१७ असा धुव्वा उडविला. मयूर शिवतरकर याच्या झंजावाती चढाया त्याला विवेक राणेची पकडीची मिळालेली भक्कम साथ यामुळे हा विजय त्यांनी सहज मिळविला.मनोहरच्या रोहन जगताप, यश चांदोरकर यांचा या सामन्यात प्रभाव पडला नाही. गोलफादेवीने गुड मॉर्निंगला ३८-१९ असे नमवित आरामात चौथी फेरी गाठली. विश्रांतीला १८-१० अशी गोलफादेवीकडे आघाडी होती. गोलफादेवीच्या या विजयाचे श्रेय अक्षय बिडू,  शार्दूल हरचकर यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला जाते. नितीन सावंत, शशिकांत पाटील गुड मॊर्निगकडून बरे खेळले.

एस एस जी फौंडेशनने वंदे मातरम मंडळाला ३७-२० असे पराभूत करीत चौथ्या फेरीत धडक दिली. पंकज मोहिते, ओमकार सावकार या विजयात प्रकर्षाने चमकले. वंदे मातरम कडून अनिकेत बागवे, हेरंब इंदुलकर बऱ्यापैकी खेळले.

या अगोदर झालेल्या दुसऱ्या फेरीच्या  सामन्याचे संक्षिप्त निकाल १)शिवशक्ती वि वि विजय क्लब (३३-२१); २) एच जी एस वि वि अमर मंडळ (३९-३४); ३)विजय बजरंग व्या. शाळा वि वि अंकुर स्पोर्ट्स (४२-१४); ४)सिद्धीप्रभा वि वि साऊथ कॅनरा (३३-३१); ५)दुर्गामाता स्पोर्ट्स वि वि ओमसाई (४२-२२).

Web Title: Kabaddi: Amar Bharat, Golfadevi mandal entered in fourth round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.