ज्योतीला सीएफआयतर्फे मिळणार चाचणीची संधी, सायकलिंग महासंघाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 01:30 AM2020-05-22T01:30:08+5:302020-05-22T06:25:14+5:30

ज्योतीने वडिलांना सायकलवर बसवून एक हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतर आठ दिवसात पूर्ण केले होते. ज्योतीने दररोज १०० ते १५० किमी सायकलिंग केले.

Jyoti will get a chance to be tested by CFI, decision of Cycling Federation | ज्योतीला सीएफआयतर्फे मिळणार चाचणीची संधी, सायकलिंग महासंघाचा निर्णय

ज्योतीला सीएफआयतर्फे मिळणार चाचणीची संधी, सायकलिंग महासंघाचा निर्णय

googlenewsNext

नवी दिल्ली : कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात गुरुग्राम ते दरभंगा असा वडिलांना घेऊन डबलसिट सायकल प्रवास करणाऱ्या ज्योतीच्या क्षमतेची दखल घेत भारतीय सायकलिंग महासंघाने (सीएफआय) तिला चाचणीची संधी देण्याचे ठरवले आहे. सीएफआय संचालक व्ही.एन. सिंग यांनी ज्योती सीएफआयच्या नियमानुसार सक्षम असल्यास विशेष सराव आणि कोचिंग दिले जाईल, असे म्हटले आहे.
ज्योतीने वडिलांना सायकलवर बसवून एक हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतर आठ दिवसात पूर्ण केले होते. ज्योतीने दररोज १०० ते १५० किमी सायकलिंग केले. महासंघ नेहमी क्षमतावान खेळाडूंच्या शोधात असतो. ज्योतीमध्ये क्षमता असल्यास आम्ही तिची पूर्ण मदत करू, असे सिंग यांनी सांगितले. ज्योतीसोबत माझे बोलणे झाले असून लॉकडाऊननंतर तिला दिल्लीला बोलविणार आहे. इंदिरा गांधी स्टेडियममध्ये ज्योतीची पाच मिनिटे चाचणी घेतली जाईल. यामुळे खेळाडूच्या पायातील क्षमतेचा वेध घेता येतो. १४-१५ वर्षांच्या मुलीकडून दररोज १०० ते १५० किमी सायकल प्रवास सहज शक्य नसतो. ज्योतीचे वडील गुरुग्राममध्ये रिक्षा चालवायचे. कोरोनामुळे जगायचे कसे हा प्रश्न पडला तेव्हा ज्योतीने वडिलांना घेऊन दरभंगा येथे पोहोचण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. स्वत:च्या घरी विलगीकरणात असलेल्या ज्योतीने चाचणीची संधी मिळणार असेल तर आपण सज्ज असल्याचे म्हटले आहे.

सायकल महासंघाकडून फोन आला होता. मी सध्या थकले आहे. लॉकडाऊननंतर संधी मिळाल्यास मी चाचणीत सहभागी होईल.मी यशस्वी ठरल्यास सायकलिंगमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणे आवडेल. कुटुंबात तीन बहिणी आणि दोन भाऊ आहेत. गरिबीमुळे मी दहावीचा अभ्यास सोडून दिला. संधी मिळाली तर पुन्हा शिकायला आवडेल. - ज्योती

Web Title: Jyoti will get a chance to be tested by CFI, decision of Cycling Federation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.