२०१८ आशियाई स्पर्धा : हिमा दासच्या नावावर आणखी एक सुवर्णपदक; भारताला मिळाला पहिला मान!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 07:44 PM2020-07-23T19:44:36+5:302020-07-23T19:48:24+5:30

भारताने 2018 आशियाई क्रीडा स्पर्धेत एकूण १६ सुवर्ण, २३ रौप्य आणि ३१ कांस्य अशी एकूण ७० पदकं जिंकली होती.

Indian mixed 4x400 relay team will now be gold medalist of Asian games, 2018 | २०१८ आशियाई स्पर्धा : हिमा दासच्या नावावर आणखी एक सुवर्णपदक; भारताला मिळाला पहिला मान!

२०१८ आशियाई स्पर्धा : हिमा दासच्या नावावर आणखी एक सुवर्णपदक; भारताला मिळाला पहिला मान!

googlenewsNext

भारताची सुवर्ण कन्या हिमा दास हिच्या नावावर आणखी एक सुवर्णपदक जमा झाले आहे. २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय मिश्र रिले संघाने ४ बाय ४०० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते. बहरीन संघाने सुवर्णपदक नावावर केले होते, परंतु त्यांची धावपटू केमी ॲडेकोया डोपिंगमध्ये दोषी आढळली. त्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले आणि त्यामुळे भारताचे रौप्यपदकाचे सुवर्णपदकात रुपांतरीत झाले. 

भारताच्या या संघात हिमासह मोहम्मद अनास, पूवम्मा आणि अरोकीया राजीव यांचा समावेश होता. भारतीय ॲथलेटिक्स संघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले,"आता भारताच्या खात्यात ॲथलेटिक्स विभागात ८ सुवर्णपदकासह २० पदकं झाली आहेत. या आनंदाच्या बातमीमुळे पुढील वर्षी होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडूंचे मनोबल उंचावण्यास मदत होईल."

हिमाने या स्पर्धेत ४ बाय ४०० मीटर रिले महिला गटात सुवर्ण, तर ४०० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते. ४ बाय ४०० मीटर मिश्र रिले गटात भारतीय खेळाडूंनी ३ मिनिटे १५.७१ सेकंदाची वेळ नोंदवली होती. आजच्या निर्णयाने मिश्र गटातील पहिले विजेते हा मानही भारताला मिळाला आहे. 

Love Story; हिंदू मुलीसोबत लग्न करण्यासाठी सोडलं पाकिस्तान अन् बनला यशस्वी क्रिकेटपटू! 

ICCच्या 'त्या' निर्णयामुळे महेंद्रसिंग धोनीसह 7 दिग्गज खेळू शकणार नाहीत वर्ल्ड कप! 

हिमेश रेशमियाच्या गाण्यावर हसीन जहाँनं तयार केला व्हिडीओ; नेटिझन्सनं विचारला 'भन्नाट' प्रश्न 

Video: मच्छिमारांच्या जाळ्यात अडकला 'Sea lion'; पुढे जे घडलं तुम्हीच पाहा... 

भाजपा प्रवेशानंतर 24 तासांतच खेळाडूनं घेतला राजकारणातून संन्यास!

"...तर कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसाला लाखाच्या घरात जाईल, कुणाला काळजी आहे का?"

OMG: लाईव्ह सामन्यात खेळाडूवर कोसळली वीज; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

 

Web Title: Indian mixed 4x400 relay team will now be gold medalist of Asian games, 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.