भारताने पाकिस्तानबरोबर खेळायला हवे, सांगतोय ऑलिम्पिकपदक विजेता सुशील कुमार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 03:26 PM2019-02-21T15:26:06+5:302019-02-21T15:26:56+5:30

खेळामुळे दोन्ही देशांतील संबंध चांगले राहतील आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल...

India have to play with Pakistan, telling Olympic medalist Sushil Kumar | भारताने पाकिस्तानबरोबर खेळायला हवे, सांगतोय ऑलिम्पिकपदक विजेता सुशील कुमार

भारताने पाकिस्तानबरोबर खेळायला हवे, सांगतोय ऑलिम्पिकपदक विजेता सुशील कुमार

googlenewsNext

नवी दिल्ली : पुलवामा दशहतवादी हल्ल्यानंतर भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानसोबत खेळू नये, अशी मागणी जोर धरत आहे. पण भारतासाठी दोन ऑलिम्पिकपदके जिंकून इतिहास रचणाऱ्या कुस्तीपटू सुशील कुमारचे मत मात्र यापेक्षा वेगळे आहे. हा हल्ला दुर्देवी असाला तरी भारताने पाकिस्तानशी खेळायला हवे, असे मत सुशील कुमारने व्यक्त केले आहे.

सुशील म्हणाला की," पुलवामा येथील हल्ला निंदनीय आहे. मी भारताच्या जवानांना सलाम करतो. मी त्यांना सांगू इच्छितो की, संपर्ण देश तुमच्या पाठिशी आहे. पण या हल्ल्यानंतरही मला असे वाटते की भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळायला हवे. कारण खेळामुळे दोन्ही देशांतील संबंध चांगले राहतील आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल." 

पाकिस्तान संघाची वर्ल्ड कप स्पर्धेतून हकालपट्टी करा, बीसीसीआय करणार मागणी
'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांना आयसीसीला पत्र लिहिण्यास सांगितले आहे. त्यात पाकिस्तान संघाला वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्यापासून रोखावे अशी विनंती करण्यास राय यांनी सुचविले आहे. पुलवामा भ्याड हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले आहेत. दरम्यान, भारताच्या अनेक माजी खेळाडूंनीही भारताने वर्ल्ड कपमध्ये पाकविरुद्ध खेळू नये असाच सूर धरला आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डात ( पीसीबी) चिंतेचं वातावरण पसरलं आहे. 

आता शांत बसणार नाही, युजवेंद्र चहल पाकिस्तानवर बरसला
पुलवामा येथे गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर देशभरात दहशतवाद आणि पाकिस्तान यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. भारताच्या क्रिकेटपटूंचाही राग आता अनावर झाला असून त्यांनी थेट युद्धाची भाषा केली आहे. भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल, 'आता शांत बसणार नाही' असे म्हणत पाकिस्तानवर चांगलाच बरसला आहे. चहल म्हणाला की, " आता भारत हे सर्व सहन करणार नाही, ते एकदाच संपायला हवं. भारतीय सीमेवर वारंवार दहशतवादी हल्ले होतात आणि त्यामध्ये आपले जवान मारले जातात. पण यापुढे असे होऊ नये, असे मला वाटते. कारण आपण बराच काळ चर्चा केली पण त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. त्यामुळे चर्चेच्या माध्यमातून या गोष्टी सुधारतील, असे मला वाटत नाही. हा विषय आता कायमचा मिटवण्याची वेळ आली आहे."

यापुढे शंभर शहीद जवानांच्या मुलांना मदत करणार - गौतम गंभीर
भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरला आर्मीमध्ये जाता आले नाही, याचा आता पश्चाताप होत आहे. पण आर्मीमध्ये जाता आले नसले तरी शहीद जवानांच्या मुलांसाठी गंभीर आपल्या एनजीओच्या माध्यमातून कार्य करत आहे. गंभीरने जवानांच्या 50 मुलांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून मदत केली होती. आता यापुढे शंभर जवानांच्या मुलांना मदत करत असल्याचे गंभीरने सांगितले. आर्मीमध्ये जाण्याबद्दल गंभीर म्हणाला की, " क्रिकेट हे माझे पहिले प्रेम कधीच नव्हते. मला आर्मीमध्ये जायचे होते. पण बारावीमध्ये असताना मी दिल्लीकडून रणजी क्रिकेट स्पर्धा खेळलो. माझी कामगिरी चांगली होत गेली. त्यामुळे मी क्रिकेटवर अधिक लक्ष दिले. " 

जवानांच्या मुलांना सेहवाग करणार शिक्षणासाठी मदत
या शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणासाठी भारताचा माजी तडफदार फलंदाज वीरेंद्र सेहवाग पुढे आला आहे. या शहीद जवानांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलण्याबाबत सेगवागने एक ट्विट केले आहे. सेहवागने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, " शहीद जवानांसाठी आपण जेवढे करू तेवढे कमीच आहे. पण शहीद झालेले जे जवान आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी मात्र आपण घेऊ शकतो. सेहवाग आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये जर शहीद जवांनाच्या मुलांनी प्रवेश घेतला तर ते माझे सौभाग्य असेल. "

Web Title: India have to play with Pakistan, telling Olympic medalist Sushil Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.