Thomas Cup : भारताच्या बॅडमिंटनपटूंनी इतिहास घडवला, रोमहर्षक विजयासह थॉमस कपच्या अंतिम फेरीत ऐटीत प्रवेश केला! 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 11:01 PM2022-05-13T23:01:50+5:302022-05-13T23:08:26+5:30

. ७३ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात प्रथमच भारतीय पुरुष संघाने अंतिम फेरीत धडक मारण्याचा पराक्रम केला.

India beat Denmark 3-2; India is through to Thomas Cup Finals for the first time  in the 73 year history of the world men's team competition | Thomas Cup : भारताच्या बॅडमिंटनपटूंनी इतिहास घडवला, रोमहर्षक विजयासह थॉमस कपच्या अंतिम फेरीत ऐटीत प्रवेश केला! 

Thomas Cup : भारताच्या बॅडमिंटनपटूंनी इतिहास घडवला, रोमहर्षक विजयासह थॉमस कपच्या अंतिम फेरीत ऐटीत प्रवेश केला! 

googlenewsNext

Thomas Cup 2022 : भारतीय पुरूष बॅडमिंटन संघाने शनिवारी ऐतिहासिक कामगिरी केली. थॉमस चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत डेन्मार्कवर ३-२ असा थरारक विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. ७३ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात प्रथमच भारतीय पुरुष संघाने अंतिम फेरीत धडक मारण्याचा पराक्रम केला. उपांत्यपूर्व फेरीत मलेशियावर विजय मिळवून भारताने या स्पर्धेतील पहिलेवहिले पदक निश्चित केले होते. पण, कांस्यपदकावर समाधान न मानता भारताने आता थेट सुवर्णपदकाच्या शर्यतीत धडक मारली आहे.

पुरुष एकेरीच्या पहिल्या सामन्यात डेन्मार्कच्या व्हिक्टर आक्सेल्सेनने २१-१३, २१-१३ अशा फरकाने लक्ष्य सेनवर विजय मिळवून १-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर दुहेरीच्या सामन्यात सात्विक रँकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनी २१-१८, २१-२३, २२-२० अशा फरकाने आस्त्रूप व ख्रिस्टियानसेन या जोडीवर रोमहर्षक विजय मिळवून सामना १-१ असा बरोबरीत आणला. 


त्यानंतर एकेरीत श्रीकांत किदम्बीने २१-१८, १२-२१ व २१-१५ अशा फरकाने आंद्रेसला पराभूत केले व भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, दुहेरीत डेन्मार्कने कमबॅक केले व सामना २-२ असा बरोबरीत आणला.

अटीतटीच्या लढतीत एचएस प्रणॉयने पुन्हा एकदा अविश्वसनीय कामगिरी केली. रास्मूस जेम्केविरुद्धच्या लढतीत त्याने १३-२१, २१-९, २१-१२ असा विजय मिळवून भारताला अंतिम फेरीत प्रवेश करून दिला. 

Web Title: India beat Denmark 3-2; India is through to Thomas Cup Finals for the first time  in the 73 year history of the world men's team competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.