थायलंड ओपनमध्ये कोर्टवर पुनरागमन होण्याची मला आशा - पी. व्ही. सिंधू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 01:38 AM2020-12-23T01:38:10+5:302020-12-23T01:38:53+5:30

P. V. Sindhu : टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली सिंधू मागील दोन महिन्यापासून लंडनमध्ये सरावात व्यस्त असून, कोरोना ब्रेकनंतर तिला पहिली स्पर्धा थायलंड ओपन खेळायची आहे.

I hope to return to the court at the Thailand Open - P. V. Sindhu | थायलंड ओपनमध्ये कोर्टवर पुनरागमन होण्याची मला आशा - पी. व्ही. सिंधू

थायलंड ओपनमध्ये कोर्टवर पुनरागमन होण्याची मला आशा - पी. व्ही. सिंधू

Next

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रकोप वाढत चालल्याने आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर निर्बंध आले आहेत. अशा स्थितीतही ब्रिटनमधून थायलंडकडे प्रवास करण्याची अपेक्षा स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने व्यक्त केली आहे. सिंधू सध्या लंडनमध्ये सराव करीत आहे. या देशात कोरोनाचा नवा विषाणू आढळताच खळबळ माजली. अनेक देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली. तरीही जानेवारीत आयोजित थायलंड ओपनमध्ये सहभागी होण्याची इच्छा सिंधूने व्यक्त केली.
टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली सिंधू मागील दोन महिन्यापासून लंडनमध्ये सरावात व्यस्त असून, कोरोना ब्रेकनंतर तिला पहिली स्पर्धा थायलंड ओपन खेळायची आहे. १२ ते १७ आणि १९ ते २४ जानेवारीदरम्यान बँकॉकमध्ये होणाऱ्या दोन स्पर्धांसाठी सिंधूला ३ जानेवारी रोजी थायलंडला पोहोचायचे आहे.
सिंधू ऑक्टोबर महिन्यात लंडनमध्ये दाखल झाली होती. स्थानिक बॅडमिंटन स्टार टोबी पेंटी आणि राजीव जोसेफ यांच्यासोबत सिंधू राष्ट्रीय बॅडमिंटन संकुलात सरावात व्यस्त आहे.
सिंधू म्हणाली, ‘माझा सराव जोरात सुरू आहे. येथील राष्ट्रीय संकुल जैवसुरक्षित असून थायलंड ओपनची तयारी करीत आहे.’ थायलंड ओपनद्वारे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनचा श्रीगणेशा होणार आहे. थायलंडमध्ये लोकशाही समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. याशिवाय अलीकडे येथेही कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली. जानेवारीतील तीन स्पर्धांसाठी खासगी फिजिओ आणि फिटनेस ट्रेनरसोबत लंडनमध्ये सराव करण्याची सिंधूची विनंती क्रीडा मंत्रालयाने मान्य केली होती. 
सिंधूने मार्च महिन्यात ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर कोरोनामुळे सर्वच स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या. ऑक्टोबरमध्ये सिंधूने डेन्मार्क ओपनमधून माघार घेतली होती. याशिवाय जर्मनीतील सारलोरलक्स ओपन सुपर १०० स्पर्धेतही तिचा सहभाग नव्हता.

Web Title: I hope to return to the court at the Thailand Open - P. V. Sindhu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BadmintonBadminton