खेल रत्न पुरस्कारासाठी 'गोल्डन गर्ल' हिमा दासच्या नावाची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 02:42 PM2020-06-16T14:42:48+5:302020-06-16T14:44:02+5:30

राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी गोल्डन गर्ल हिमा दास हिच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे

Hima Das Nominated for Khel Ratna Award  | खेल रत्न पुरस्कारासाठी 'गोल्डन गर्ल' हिमा दासच्या नावाची शिफारस

खेल रत्न पुरस्कारासाठी 'गोल्डन गर्ल' हिमा दासच्या नावाची शिफारस

Next

राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी गोल्डन गर्ल हिमा दास हिच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.  आसामचे क्रीडा सचिन दुलाल चंद्रा दास यांनी तिच्या नावाच्या शिफारसीचं पत्र पाठवले आहे. 20 वर्षीय हिमाचा जन्म आसामच्या धिंग गावातील आहे. तिनं 2018 मध्ये 20 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला होता. खेल रत्न पुरस्कारासाठी तिच्यासह भालाफेकपटू नीरज चोप्रा, कुस्तीपटू विनेश फोगाट, टेबल टेनिसपटू मनिका बात्रा, महिला हॉकीपटू राणी रामपाल आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांच्या नावाचीही शिफारस केली गेली आहे.

सचिन तेंडुलकरचा बंगला आतून कसा दिसतो माहित्येय? पाहा Photo

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदकानंतर तिनं जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत 400 मीटर शर्यतीत रौप्य, तर 4 बाय 400 मीटर मिश्र रिले शर्यतीत सुवर्ण आणि 4 बाय 400 मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्यानंतर 2019मध्येही तिनं गोल्डन धमाका सुरूच ठेवला. तिला दोहा येथील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचेही निमंत्रण देण्यात आले होते, परंतु दुखापतीमुळे तिनं माघार घेतली.

2018मध्ये तिला अर्जुन पुरस्कारानं सन्मानित केले होते. तिच्यासह यंदा बॉक्सिंग लोवलीना बोर्गोहेन हिची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.   

Well Done; CSK साठी मोची काम करणाऱ्या भास्करन यांना इरफान पठाणची आर्थिक मदत!

मोठी अपडेट; IPL 2020चा मार्ग मोकळा, BCCI साठी गुड न्यूज?

कोरोनामुक्त झालेल्या देशात पुन्हा कोरोनाचा शिरकाव, परदेशातून आलेले प्रवासी 'पॉझिटिव्ह'

शाळकरी मुलांचं पोट भरण्यासाठी स्टार खेळाडूनं जमा केले 191 कोटी; आता थेट सरकारला लिहिलं पत्र!

Web Title: Hima Das Nominated for Khel Ratna Award 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.