राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद सर्धेच्या पहिल्या दिवशी हरयाणाच्या कुस्तीपटूंची चमक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 10:02 PM2019-09-27T22:02:56+5:302019-09-27T22:03:43+5:30

हरयाणा संघाने 158 गुणांची कमाई केली.

Haryana wrestlers shine on the first day of the National Wrestling Championship | राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद सर्धेच्या पहिल्या दिवशी हरयाणाच्या कुस्तीपटूंची चमक

राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद सर्धेच्या पहिल्या दिवशी हरयाणाच्या कुस्तीपटूंची चमक

googlenewsNext

शिर्डी : हरयाणाच्या पुरुष फ्रीस्टाईल संघाने जोरदार कामगिरी करत टाटा मोटर्स 23 वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या दिवशी चमक दाखवली. महाराष्ट्राच्या शिर्डी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एक सुवर्णपदक, चार रौप्यपदक आणि तीन कांस्यपदकांसह एकूण 8 पदकांची कमाई केली. हरयाणा संघाने 158 गुणांची कमाई केली. दुस-या स्थानी सर्विसेस (150 गुण) आणि चंदीगढने 130 गुणांसह तिसरे स्थान पटकावले. या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान बुडापेस्ट येथे होणा-या 23 वर्षाखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील.

यजमान महाराष्ट्राच्या सिकंदर (92 किलो) आणि सुरज (61 किलो) यांनी दोन पदकांची कमाई केली. सिकंदरने हरयाणाच्या सुनिलला 10-6 असे पराभूत केले. तर, सुरजला रविंदरकडून 3-5 असे पराभूत व्हावे लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.सर्विसेसने चार आणि उत्तरप्रदेशने दोन सुवर्णपदक मिळवले.तर, चंदीगढ, हरयाणा व दिल्लीने एक-एक सुवर्णपदकाची कमाई केली.

 2017 सालचा ज्युनियर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदाक विजेता वीर देव गुलिया (79 किलो) याने उत्तरप्रदेशच्या सचिनला 6-3 असे नमविले.तर, नवीनने (70 किलो) हरयाणाच्या विशालला 6-3 असे नमवित सुवर्णपदकाची कमाई केली. 74 किलोच्या अंतिम सामन्यात गौरव (उत्तरप्रदेश) याने हरयाणाच्या प्रितमला 5-0 असे नमविले. 65 किलो वजनीगटात चंदीगढच्या श्रावणने दिल्लीच्या सनीला 4-0 असे नमवित सुवर्णपदक मिळवले. हरयाणाच्या नवीनने चंदीगढच्या सुमितला 57 किलो गटात नमविले. 97 किलो वजनी गटात दिल्लीच्या आकाश अंतिलने हरयाणाच्या अमितला 12-5 असे, 86 किलो व 125 किलो अंतिम सामन्यात अनुक्रमे संजित (सर्विसेस) आणि आर्यन (उत्तरप्रदेश) यांना वॉकओव्हर मिळाल्याने पदक पटकावले. शनिवारी 28 राज्यातील 10 वजनीगटात 300 महिला कुस्तीगीर सहभाग नोंदवणार आहेत.

Web Title: Haryana wrestlers shine on the first day of the National Wrestling Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.